मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:26 IST

वाशिममध्ये गणेश मूर्तीजवळ अश्लील क्यूआर कोड; तीन तरुणांना पोलिसांकडून अटक

वाशिम शहरातील गणेश मंडळाच्या मूर्तीजवळ आणि हनुमान मंदिरात अश्लील व्हिडिओ दाखवणारा क्यूआर कोड स्कॅनर लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाशिम पोलिसांनी तीन महाविद्यालयीन तरुणांना अटक केली आहे.

वाशिममध्ये गणेश मूर्तीजवळ अश्लील क्यूआर कोड; तीन तरुणांना पोलिसांकडून अटक
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वाशिम शहरातील जय भवानी गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीच्या पाटाखाली आणि हनुमान मंदिरात एक क्यूआर कोड स्कॅनर लावून त्यातून अश्लील व्हिडिओ दाखवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाशिम पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे.

राम अर्जुन काळबांडे (राहणार काळे फाईल, जिल्हा वाशिम) यांनी पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री साधारण ११ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने गणेश मूर्तीच्या पाटाला क्यूआर कोड स्कॅनर चिकटवला आणि त्याद्वारे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले. या फिर्यादीच्या आधारे पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे अज्ञातांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन प्रकरण उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस स्टेशन वाशिम शहर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर तत्काळ चार पथकांनी घटनास्थळ परिसरातील आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली, तेव्हा संशयित तरुण दिसून आले. गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्यांची नावे आणि राहण्याची ठिकाणे शोधून काढण्यात आली. संशयितांची नावे तन्मय शंकर मुठाळ (वय १९, राहणार चिवरा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम), युगंधर मोहन अफुने (वय १८, राहणार अंबिकानगर, लाखाळा, तालुका व जिल्हा वाशिम) आणि सुमित कैलास भोने (वय १८, राहणार सावरगाव जिरे, तालुका व जिल्हा वाशिम) अशी निष्पन्न झाली.

स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस स्टेशन वाशिम शहर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली, त्यानंतर त्यांना कायदेशीररित्या अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय चौधरी करत आहेत.

ही कामगिरी पोलिस निरीक्षक सुधाकर आढे (स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा वाशिम) आणि पोलिस निरीक्षक संजय चौधरी (पोलिस स्टेशन वाशिम शहर) यांच्या नेतृत्वाखाली सपोनि जितेंद्र आडोळे, सपोनि सीता वाघमारे, पोउपनि नीलेश जाधव, पोउपनि सचिन गोखले, पोउपनि शेखर मास्कर आदींनी पार पाडली.

वाशिमचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांनी सांगितले की, या तिन्ही तरुणांनी टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला होता आणि त्यात अश्लील व्हिडिओ टाकून ते स्कॅनरला जोडले होते. गर्दीच्या ठिकाणी हे स्कॅनर लावून जास्तीत जास्त नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन केल्यावर व्हिडिओ दिसावा आणि त्यातून १५ ते २० रुपयांची कमाई करावी, हा आरोपींचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ