मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:27 IST

वर्ध्यात प्रवासी बसच्या तपासणीत विदेशी दारू आणि बियरचा साठा जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा

वर्धा शहर पोलीस स्टेशनला मुखबिराकडून मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या टीमने सापळा रचून विदेशी दारू आणि बियरचा मोठा साठा जप्त केला.

वर्ध्यात प्रवासी बसच्या तपासणीत विदेशी दारू आणि बियरचा साठा जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अंमलदार यांना मुखबिराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. गणेशनगर वर्धा येथे राहणारा सागर मौर्य नावाचा इसम त्याच्या साथीदारासह नागपूर जिल्ह्यातून विदेशी दारू आणि बियरचा माल घेऊन वसंत टॉकिज जवळील ट्रॅव्हल्स पॉईंटवर येणार असल्याची ही माहिती होती. दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी ही माहिती मिळाल्यानंतर पंच आणि पोलीस स्टाफसह बच्छराज जीन ट्रॅव्हल्स पॉईंट वर्धा येथे सापळा रचण्यात आला.

या सापळ्यात पोलिसांनी दोन इसमांना ताब्यात घेतले. पहिला आरोपी सागर राजेंद्र मौर्य, वय 29 वर्ष, मूळ रहिवासी भगवान नगर नागपूर, हल्ली मुक्काम गणेश नगर बोरगाव मेघे वर्धा. दुसरा आरोपी अभिनव नरेंद्र सहारे, वय 26 वर्ष, राहणार मोठ्या विहिरीजवळ स्टेशनफैल तहसील जिल्हा वर्धा. या दोघांजवळील दोन मोठ्या बॅगा आणि हातातील दोन कापडी पिशव्यांची तपासणी पोलिसांनी केली.

तपासणीत ऑफिसर चॉईस कंपनीच्या 180 एमएलच्या विदेशी दारूच्या 36 भरलेल्या शिश्या, ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या 180 एमएलच्या 60 सीलबंद शिश्या, मॅजिक मुमेट जामुन कंपनीच्या 180 एमएलच्या 25 सीलबंद शिश्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 एमएलच्या 70 सीलबंद शिश्या, सहयाद्री गोल्ड कंपनीच्या 180 एमएलच्या 10 सीलबंद शिश्या, ग्रॅन्ड मास्टर मिलन कंपनीच्या 180 एमएलच्या 24 शिश्या, मास्टर डि लाईट कंपनीच्या 180 एमएलच्या 07 शिश्या आणि रॉयल चॅलेंज कंपनीच्या 180 एमएलच्या 05 सीलबंद शिश्या आढळल्या. याशिवाय कासबर्ग कंपनीच्या 500 एमएलच्या टिनाचे 24 सीलबंद कॅन, टुबर्ग कंपनीच्या 500 एमएलच्या टिनाचे 42 सीलबंद कॅन आणि बडवायजर कंपनीच्या 500 एमएलच्या टिनाचे 18 सीलबंद कॅन जप्त करण्यात आले. हा एकूण जुमला 1,20,100 रुपये किंमतीचा असून जप्ती पंचनाम्याप्रमाणे तो जप्त करण्यात आला.

आरोपींना ही विदेशी दारू कुठून आणली याबद्दल विचारपूस केली असता, सिताबर्डी नागपूर येथील रतुल वाईन शॉपच्या मॅनेजरकडून हा माल विकत आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार तिघां आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे कलम 65 (ई), 77 (अ) आणि 83 मदाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक परवेझ खॉन तसेच पोलीस अंमलदार गजानन लामसे, संजय बोगा, अरविंद घुगे, पवन निलेकर, समीर शेख आणि रविकिरण मून यांचा सहभाग होता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ