मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:41 IST

कारंजा पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात पोक्सो खटल्यातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयाने पोक्सो खटल्यात भिमराव खुशाल पाटील उर्फ भन्तेजी याला २० वर्षे सश्रम कारावास आणि २०००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

वर्धा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अन्सारी (डि.जे.३) यांनी एका पोक्सो कायद्याखालील खटल्यात आरोपीला शिक्षा सुनावली आहे. कारंजा पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. ३८२/२४ नुसार भादवि कलम ३७६ (३) (एन), ३७६ (अब) सह पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी भिमराव खुशाल पाटील उर्फ भन्तेजी, वय ५५ वर्षे, राहणार लोहारी सावंगा, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर, याला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली आहे.

शिक्षेचा तपशील असा आहे : कलम ३७६ (३), ३७६ (अव) भादवि सह पोक्सोच्या कलम ६ नुसार २० वर्षे सश्रम कारावास आणि २०००० रुपये दंड. आरोपीने हा दंड भरला नाही, तर त्याला १ वर्ष साधा कारावास भोगावा लागणार आहे.

घटनेचा थोडक्यात तपशील असा की, आरोपी काकडा, ता. कारंजा (घाडगे) येथील बौध्द विहारात भन्तेजी म्हणून राहत होता. त्याने एका अल्पवयीन मुलीला विहाराच्या मागच्या रूममध्ये बोलावले, दार बंद केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप होता. फिर्यादीने पोलिसांकडे दिलेल्या रिपोर्टवरून कारंजा पोलीस स्टेशनमध्ये वर सांगितलेल्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास सपोनि. धनश्री कुटेमाटे यांनी केला आणि त्यानंतर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता श्री. प्रसाद सोईतकर यांनी खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहिले. त्यांना मदत करताना सफौ पंचम कोटगिरवार, ब.नं. ४७० यांनी साक्षीदारांना वेळोवेळी न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली.

कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो.नि. श्री. प्रल्हाद मदन यांनीही या गुन्ह्यातील साक्षीदारांना आरोपीविरुद्ध प्रभावी साक्ष देता यावी म्हणून वेळोवेळी ब्रिफिंग केले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

न्यायाधीश श्रीमती अन्सारी यांनी या गुन्ह्यातील फिर्यादी, पीडित मुलगी आणि तपास अधिकारी यांची साक्ष तपासली. तसेच न्यायालयासमोर उपलब्ध असलेले पुरावे पाहून त्यांनी आरोपीला कलम ३७६ (३), ३७६ (अ.ब) भादवि सह ४, ६ पोक्सो अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास, २०००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

ही माहिती स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नावाने देण्यात आली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ