मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:31 IST

४ ऑक्टोबरच्या मोर्चावरून नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका, दिपकेंचाही उल्लेख

निवडणूक आयोगाविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

४ ऑक्टोबरच्या मोर्चावरून नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका, दिपकेंचाही उल्लेख
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा निघणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना या मोर्चावर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात काम करत आहेत."

निवडणूक आयोग आणि आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जे आंदोलन उभारले जात आहे, त्याबद्दल म्हस्के म्हणाले की महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला आणि त्याचे कारण ज्ञानेश कुमार असल्याचे सांगितले जात आहे. मुळात तेव्हा ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त नव्हते, असे त्यांनी म्हटले. आपला पराभव का झाला, यासाठी संजय राऊत यांनी आयोग नेमला पाहिजे, असेही ते म्हणाले.

म्हस्के यांचे म्हणणे असे की उद्धव ठाकरे यांनी "मी का हरलो?" याचे आत्मपरीक्षण करावे. राज ठाकरे यांना जर मी तुच्छ वागणूक दिली नसती, तर पराभव झाला नसता, हे उद्धव ठाकरे यांना कळेल, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्यावरही म्हस्के यांनी टीका केली. ते म्हणाले, "दिपके यांचे दिल्लीतील आंदोलन आपण पाहिले. सगळ्या डाव्या पिलावळी तिथे होत्या. ज्यांनी कायम हिंदुत्वाला विरोध केला. त्यांच्यासोबत ठाकरे बंधू हातमिळवणी करणार का?" असा सवालही त्यांनी केला.

म्हस्के यांनी पुढे म्हटले, "स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अभिजित दिपके या कालच्या आलेल्या पोरासोबत त्यांना हातमिळवणी करावी लागते, याचे वाईट वाटते." शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून आंदोलन सुरू करण्यास ठाकरे यांनी दिपके यांना सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. सध्या दिपके यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात काम करत आहेत, असे ते म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीवरूनही म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांना आमदार आणि खासदार सांभाळण्यासह इतर कामे असल्याने बैठकीला सर्वजण उपस्थित राहतीलच असे नाही, असा दावा त्यांनी केला. ४ ऑक्टोबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ