मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:47 IST

सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक तिरंगी होणार; युगेंद्र पवार यांच्या पॅनलची यादी जाहीर

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गट, अजित पवार गट आणि अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे स्वतंत्र पॅनल असे तीन पॅनल रिंगणात आहेत.

सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक तिरंगी होणार; युगेंद्र पवार यांच्या पॅनलची यादी जाहीर
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी ही यादी जाहीर केली. श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून इतर पक्षांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या यादीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्ता चव्हाण आणि बारामती तालुका पंचायत समितीचे माजी सभापती पोपट पानसरे यांचा समावेश आहे. राजेंद्रकुमार जगताप यांच्यासह इतर उमेदवारांचीही नावे यादीत आहेत.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने "श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पॅनल" या नावाने आपले पॅनल जाहीर केले. जय पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. या गटाच्या उमेदवारांची निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुलाखती घेऊन केली. मुलाखतींना जय पवार हेही सुरेंद्र पवार यांच्याबरोबर उपस्थित होते.

कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या साथीने त्यांनी स्वतंत्र पॅनलची घोषणा केली. त्यामुळे ही निवडणूक आता तिरंगी होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या घडामोडी घडल्या आणि निवडणुकीला वेगळे वळण मिळाले. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटांत लढत होईल असे दिसत होते, पण पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेमुळे आता तीन पॅनल समोरासमोर आहेत. ही तिरंगी लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.

युगेंद्र पवार गेले अनेक दिवस कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आणि तालुक्यातील लोकांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कार्यक्षेत्रात सभासद आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर विविध गावांत सभासदांशी संपर्क अभियान सुरू ठेवून त्यांनी उमेदवारांची चाचपणी केली.

राजेंद्रकुमार जगताप यांनी सांगितले की, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे.

शेतकरी विकास पॅनलचे गटनिहाय उमेदवार असे आहेत. निंबुत-खंडाळा गट: दत्ताजीराव रामराव चव्हाण (निरा शिवतक्रार), शंभूराजे सूर्यकांत काकडे (निंबुत), सुभाषराव नामदेव कोळेकर (बावकलवाडी), डॉ. मैत्रेयी शशिकांत काकडे (निंबुत), सोमनाथ कृष्णा मदने (गडदरवाडी).

मुरूम-वाल्हा गट: राजेंद्रकुमार तुकाराम जगताप (वाणेवाडी), प्रवीण शिवाजीराव भोसले (वाणेवाडी), संदीप सदाशिव चव्हाण (मुरूम), सुरेखा बाबुराव गायकवाड (करंजेपूल). होळ-मोरगाव गट: अनिलकुमार चंदूलाल शहा (वडगाव निंबाळकर), दत्तात्रय भिवा ढोले (मोरगाव), सुनीता शिवाजी कारंडे (होळ), हर्षद अशोक होळकर (सदोबाची वाडी).

कोऱ्हाळे-सुपा गट: सतीश नामदेव खोमणे (कोऱ्हाळे बुद्रुक), पोपट गणपतराव पानसरे (पानसरेवाडी), शिवराज ऊर्फ प्रवीण तानाजी पवार (थोपटेवाडी), गोविंद कृष्णा पवार (कोऱ्हाळे खुर्द). मांडकी-जवळा-अर्जुन गट: संतोष एकनाथराव जगताप (सासवड), संदीप रामचंद्र देवकर (मावडी सुपे), अंकुश मुरलीधर जगताप (मांडकी).

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ