शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

श्रीकृष्णांबद्दलच्या वक्तव्यावरून नागपुरात संताप, बागेश्वर बाबांविरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार

PT24 टीम

भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दलच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद नागपुरात उमटले असून, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता नागपुरातही उमटले आहेत. बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्याविरोधात नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. अक्षय सुभाष समर्थ यांनी ही तक्रार दिली आहे. श्रीकृष्णाच्या भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या वक्तव्यांची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

तक्रारीत म्हटल्यानुसार, २९ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात करेरा येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्या श्रीराम कथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल टिप्पणी केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. "हमारे राम सीधे हैं, तुम्हारे कृष्ण टेढ़े हैं" असे ते म्हणाल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा कार्यक्रम मध्य प्रदेशात झाला असला, तरी तक्रार नागपुरात दाखल झाली आहे.

एवढेच नाही, तर श्रीकृष्णाचे रूप, देहबोली, बासरीवादन आणि दिव्य लीला यांच्याबाबतही तुलना करणारी टिप्पणी करण्यात आल्याचे तक्रारीत सांगितले आहे.

अ‍ॅड. समर्थ यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या वक्तव्यांमुळे कोट्यवधी श्रीकृष्ण भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि ३०२ अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय संबंधित कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ फुटेज मिळवावे, वक्तव्यांचा संदर्भ आणि त्यावेळची परिस्थिती तपासावी आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशीही मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. या सर्व मागण्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून पोलिसांसमोर मांडण्यात आल्या आहेत. तक्रार दाखल करताना अनेक नागरिक तिथे उपस्थित होते.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ