पाठीतून पायापर्यंत कळ येतेय? सायटिकाची लक्षणे वेळीच ओळखा, नाहीतर अंथरुणाला खिळाल
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
तासनतास एका जागी बसून राहण्याने वाढणाऱ्या सायटिकाची लक्षणे, कारणे आणि घरगुती काळजी याबद्दल माहिती.
आजकाल अनेकांची जीवनशैली बैठी झाली आहे. तासनतास एका जागी बसून काम करणे, मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये गुंतून राहणे आणि कामाचा वाढता तणाव यामुळे सायटिकाची लक्षणे वाढू शकतात. याचा परिणाम शरीरावर तसाच मनावरही दिसून येतो.
पाठीच्या खालच्या भागातून अचानक एक तीव्र कळ येते आणि ती नितंबातून पायाच्या मागच्या बाजूने थेट खाली सरकत येते, असे वाटू लागते. या वेदनांना सायटिका म्हणतात. हा त्रास कधी कधी खूपच अस्वस्थ करणारा असतो. सायटिका झाल्यावर शरीरात अनेक बदल होतात, म्हणून दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.
सायटिक नर्व्ह ही शरीरातील सर्वात लांब आणि जाड मज्जातंतू आहे. ती पाठीच्या मणक्यापासून सुरू होते, नितंब आणि मांडीच्या मागच्या बाजूने जाऊन थेट पायाच्या बोटांपर्यंत पोहोचते. मणक्याच्या ठिकाणी किंवा इतर भागांवर दाब पडला की जळजळ आणि वेदना वाढू लागतात.
मणक्यातील गादी सरकल्यामुळेही ही समस्या प्रामुख्याने उद्भवते. मणक्याभोवतीच्या स्नायूंची झीज झाली किंवा ते कडक झाले, तर ते मज्जातंतूवर दाब टाकतात. त्यामुळे कोणत्याही एका पायावर जास्त ताण येतो. वेळेत लक्ष दिले नाही, तर माणूस अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ येऊ शकते.
सायटिका झाल्यावर दिसणारी लक्षणे अशी: पायात मंद किंवा तीव्र कळ येणे, पोटरीत किंवा पाऊलात सुया टोचल्यासारखे वाटणे, पायाचा काही भाग बधीर होणे, पाय उचलताना किंवा उभे राहताना अशक्तपणा जाणवणे आणि अचानक तीव्र वेदना होणे. ही लक्षणे दिसू लागल्यावर दुर्लक्ष केले, तर गंभीर समस्या वाढू शकतात.
उपचार वेळेवर करणे फार महत्त्वाचे आहे. शस्त्रक्रिया किंवा तीव्र वैद्यकीय उपचारांशिवाय, घरगुती काळजी घेतल्यास काही आठवड्यांत सायटिकावर मात करता येते. दिवसभर अंथरुणावर पडून राहिल्यास स्नायू कडक होतात आणि आजारातून बरे होण्यास बराच वेळ लागतो. म्हणून रक्तभिसरण सुधारण्यासाठी हलक्या हालचाली करणे आवश्यक आहे.
पहिल्या १ ते २ दिवसांत तीव्र वेदना आणि सूज कमी करण्यासाठी बर्फाने शेक घ्यावा. बर्फाच्या शेकामुळे पाठीच्या खालच्या भागातील कडक झालेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते आणि रक्तभिसरण सुधारते. याशिवाय अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून गरम पाण्याने अंघोळ करावी.
हा मजकूर केवळ सामान्य माहितीसाठी आहे आणि यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.