मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:46 IST

वृक्षारोपणासाठी कायद्याचं बंधन कशाला? वन विभागाला अतिक्रमण दिसत नाही का, सयाजी शिंदे यांचा सवाल

सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे प्रमुख आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी नागपूर जिल्ह्यातील देवराईच्या जागेवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. वन विभागाने जागा राखीव वनक्षेत्र असल्याचं कारण देत नकार दिला आहे.

वृक्षारोपणासाठी कायद्याचं बंधन कशाला? वन विभागाला अतिक्रमण दिसत नाही का, सयाजी शिंदे यांचा सवाल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाराष्ट्रात वृक्षारोपणासाठी परवानगी कशाला लागते, झाडं लावायला कायद्याचं बंधन कशासाठी, आणि वन जमिनीवर झालेलं अतिक्रमण वन विभागाला दिसत नाही का, असे उद्विग्न प्रश्न प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि 'सह्याद्री देवराई फाऊंडेशन'चे (Sahyadri Devrai Foundation) प्रमुख सयाजी शिंदे यांनी विचारले आहेत. प्रशासनाला हे प्रश्न विचारत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सह्याद्री देवराई फाऊंडेशनच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील वेगवेगळ्या भागांत वृक्षारोपणाच्या क्षेत्रात मोलाचं काम केलं आहे. आता त्यांनी पूर्व विदर्भातही काम सुरू केलं आहे. नागपूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा दाखवली असून, गावाजवळ देवराई उभारण्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत.

मात्र वन विभागाचे अधिकारी या कामात कायद्याचा अतिरेकी आग्रह धरून अडचणी निर्माण करत आहेत, असा सयाजी शिंदे यांचा आरोप आहे.

नागपूर जिल्ह्यातील 'बेला' ग्रामपंचायतीनं आपल्या गावाजवळ सयाजी शिंदे यांच्या फाऊंडेशनसोबत मिळून सह्याद्री देवराई करण्यासाठी वन विभागाकडे जागा मागितली आहे. पण बेला ग्रामपंचायत आणि फाऊंडेशननं मागितलेली जागा द्यायला वन विभागानं नकार दिला आहे. ती जागा राखीव वनक्षेत्र आहे, त्यामुळे ती देवराईसाठी देता येणार नाही आणि तिथे वृक्षारोपणाला परवानगीही देता येणार नाही, असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

यावर सयाजी शिंदे आणि त्यांचे सहकारी वेगळा दावा करतात. ज्या जागेला वन विभाग राखीव वनक्षेत्र म्हणतोय, तिथे कुठलंही झाड नाही, असं ते म्हणतात. उलट काही लोकांनी त्या जागेवर अतिक्रमण करून नियमबाह्य पद्धतीनं शेती सुरू केली आहे, असा त्यांचा आरोप आहे.

याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रात देवराईसाठी वन विभागानं सहकार्य करावं, अशी मागणी त्यांनी तेव्हा केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून एक पत्र दिलं होतं. सयाजी शिंदे यांच्या देवराई फाऊंडेशनला नियमाप्रमाणे सहकार्य करावं, असे निर्देश त्या पत्रात होते.

असं असताना वन विभागाचे अधिकारी नियमांची आडकाठी करून वृक्षारोपणाचा प्रस्तावित उपक्रम अडवत आहेत, असा सयाजी शिंदे यांचा आरोप आहे. स्वतःच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाची मात्र त्यांना फिकीर नाही, असंही शिंदे यांचं म्हणणं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ