सॅमसंगचा सर्वात स्लिम टॅबलेट गॅलॅक्सी टॅब एस१२ सिरीज भारतात विक्रीला, किंमत १.२९ लाखांपासून
सैमसंग इंडियाने गॅलॅक्सी टॅब एस१२ अल्ट्रा आणि टॅब एस१२+ या दोन टॅबलेट्सची देशभरात विक्री जाहीर केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सैमसंग इंडियाने आपल्या 'गॅलॅक्सी टॅब एस१२ सिरीज'च्या देशभरातील विक्रीची अधिकृत घोषणा केली आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीच्या या कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली आणि बहुउद्देशीय टॅबलेट सिरीज आहे. अल्ट्रा-थिन डिझाइन, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि आधुनिक गॅलॅक्सी एआय यांची सांगड या टॅबलेट्समध्ये घालण्यात आली आहे. ग्रे आणि सिल्व्हर अशा दोन रंगांत हे टॅबलेट्स मिळतील.
सिरीजमध्ये गॅलॅक्सी टॅब एस१२ अल्ट्रा (१४.६-इंच) आणि टॅब एस१२+ (१२.६-इंच) असे दोन मॉडेल आहेत. दोन्हींना डायनॅमिक एएमओएलईडी २एक्स डिस्प्ले आहे, ज्याचा पीक ब्राईटनेस १६०० निट्सपर्यंत जातो. व्हिजन बूस्टर हे वैशिष्ट्य कोणत्याही प्रकाशात ब्राईटनेस आपोआप समायोजित करते. गॅलॅक्सी टॅब एस१२ अल्ट्रा केवळ ५.१ मिमी स्लिम असून तो सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅब आहे. टॅब एस१२+ ची जाडी ५.३ मिमी आहे.
दोन्ही डिवाइसेसमध्ये ऊर्जा-कार्यक्षम ३ एनएम प्रोसेसर आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत हा प्रोसेसर ६१% वेगवान एनपीयू, १९% वेगवान सीपीयू आणि १७% सुधारित जीपीयू पॉवर देतो. बॅटरी अल्ट्रा मॉडेलवर २३ तासांपर्यंत आणि प्लस मॉडेलवर २१ तासांपर्यंत चालते. ४५ वॅट अडॅप्टरने ती अवघ्या ९५ मिनिटांत १००% चार्ज होते. उष्णतेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन ३डी व्हेपर चेंबर दिला आहे.
ही सिरीज अँड्रॉइड १७ आणि वन यूआय ९ वर चालते. नोट असिस्ट, गूगल एआय प्रो (जेमिनायचा ६ महिन्यांचा ट्रायल) आणि सैमसंग ब्राउझर असे गॅलॅक्सी एआय फीचर्स त्यात मिळतात. व्यावसायिक कामांसाठी अडोबी फोटोशॉप, गुडनोट्स (१ वर्ष मोफत), लुमाफ्युजन आणि क्लिप स्टुडिओ पेंट हे अॅप्स विशेष सवलतींसह उपलब्ध आहेत. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी डिवाइसेसना आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. शिवाय ७ वर्षांचे ओएस आणि सिक्युरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत.
किमतीबद्दल सांगायचे तर गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्राची सुरुवातीची किंमत १,४९,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ ची सुरुवातीची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. अल्ट्रासाठीच्या प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २७,९९९ रुपये, तर एस१२+ साठीच्या कव्हरची किंमत २६,४९९ रुपये आहे. दोन्ही मॉडेल्स वाय-फाय आणि ५जी व्हेरिएंट्समध्ये येतात. त्यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी किंवा ५१२ जीबी स्टोरेजचे पर्याय आहेत. ७ ऑक्टोबरपासून ते सैमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, पार्टनर स्टोअर्स, सॅमसंगडॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर मिळतील.
खरेदीवर ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स जाहीर झाल्या आहेत. सैमसंग स्मार्टफोनच्या खरेदीवर १५,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. निवडक वेअरेबल्सवर १५% आणि प्रो कीबोर्ड कव्हरवर ३०% सूट आहे. ५,००० रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस मिळेल. प्रमुख बँक आणि एनबीएफसी भागीदारांमार्फत २४ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयची सुविधाही आहे.
सॅमसंगने टॅबलेट्ससाठी पहिल्यांदाच 'गॅलॅक्सी फॉरएव्हर' हा २ वर्षांचा प्रोग्राम आणला आहे. १२,४९९ रुपये किमतीच्या या पॅकमध्ये ग्राहक मूळ किमतीच्या ७५% रक्कम आणि प्रोग्राम फी २४ ईएमआयमध्ये भरून टॅब घेऊ शकतात. २४ महिन्यांच्या आत ४०% पर्यंत निश्चित बायबॅक मूल्यासह अपग्रेडचा पर्याय त्यात आहे. २ वर्षांसाठी मोफत सैमसंग केअर+ सुरक्षाही मिळते.