सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
08:22 IST

रेनोची डस्टर हायब्रिड लॉन्च, 16.99 लाखांपासून सुरू; कंपनीचा 29 kmpl मायलेजचा दावा

रेनो डस्टर हायब्रिड अधिकृतपणे लॉन्च झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ती 29 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते आणि फुल टँकमध्ये 1400 किलोमीटरपेक्षा जास्त धावते.

रेनोची डस्टर हायब्रिड लॉन्च, 16.99 लाखांपासून सुरू; कंपनीचा 29 kmpl मायलेजचा दावा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ज्या गाडीची खूप दिवस वाट पाहिली जात होती, ती रेनो डस्टर हायब्रिड (Renault Duster Hybrid) अखेर अधिकृतपणे लॉन्च झाली आहे. कंपनीने गाडीच्या किमतीही जाहीर केल्या आहेत. रेनोची ही देशातील पहिलीच स्ट्रॉन्ग हायब्रिड गाडी ठरली आहे. मायलेज आणि अॅडव्हान्स फीचर्समुळे ही एसयूव्ही सध्या चर्चेत आहे.

या एसयूव्हीसाठी कंपनीने पुन्हा एकदा बुकिंग सुरू केली आहे. ग्राहकांना केवळ 21000 रुपये टोकन अमाऊंट भरून ही गाडी बूक करता येईल.

नवीन डस्टर हायब्रिडमध्ये 1.8 लिटरचे, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. या इंजिनाला दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि 1.4 kWh क्षमतेची बॅटरी जोडली आहे. हा सगळा सेटअप मिळून 160 bhp पॉवर आणि 208 Nm टॉर्क तयार करतो. पेट्रोल इंजिन एकटे 110 PS पॉवर आणि 175 Nm टॉर्क देते. कंपनीच्या दाव्यानुसार ही एसयूव्ही 0 ते 100 किमी / ताशी वेग केवळ 9.6 सेकंदात गाठू शकते.

गाडीत ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 6 प्रगत ड्रायव्हिंग मोड्स आहेत. रस्त्याच्या परिस्थितीनुसार हे मोड आपोआप बदलतात. बॅटरी चार्ज करण्यासाठी बाहेरचा कोणताही चार्जिंग पॉईंट लागत नाही, कारण गाडी चालवताना आणि ब्रेक लावताना ती स्वतःहून चार्ज होते.

या एसयूव्हीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचे मायलेज. कंपनीचा दावा आहे की ही गाडी 29 किलोमीटर प्रति लिटर (kmpl) मायलेज देते. शहरातील गर्दीच्या रस्त्यावर ती तब्बल 80 टक्के वेळ इलेक्ट्रिक मोड (EV Mode) वर धावू शकते, असेही सांगितले आहे.

गाडीला 50 लिटरची इंधन टाकी आहे. एकदा टँक फुल केल्यावर ती 1400 किलोमीटरपेक्षा जास्त धावण्याची रेंज देते. मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये हा आतापर्यंतचा सर्वाधिक क्लेम केलेला मायलेज मानला जातो. मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर यांसारख्या मॉडेल्सच्या तुलनेत डस्टरची पॉवर आणि मायलेज दोन्ही सरस ठरत आहेत.

रेनोने डस्टर हायब्रिड तीन प्रमुख व्हेरियंट्समध्ये सादर केली आहे. इव्होल्यूशन (Evolution) व्हेरियंटची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत Rs 16.99 लाख आहे. टेक्नो (Techno) Rs 18.99 लाख आणि इमोशन (Emotion) Rs 19.49 लाख (एक्स-शोरूम) अशा किमतीत मिळेल.

ग्राहकांच्या विश्वासासाठी कंपनी गाडीसोबत 7 वर्षांची वॉरंटी देत आहे. बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1.6 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी मिळणार आहे. भारतीय बाजारात ही गाडी मारुती ग्रँड विटारा हायब्रिड आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर यांना तगडी टक्कर देणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ