मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 18:40 IST

रात्री मेकअप काढायला महागडे प्रॉडक्ट नको, स्वयंपाकघरातले खोबरेल तेल आणि कोरफड जेल पुरेसे

मेकअप रात्री न काढल्यास पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि अकाली सुरकुत्या येऊ शकतात. घरातले साधे पदार्थ वापरून तो सहज काढता येतो.

रात्री मेकअप काढायला महागडे प्रॉडक्ट नको, स्वयंपाकघरातले खोबरेल तेल आणि कोरफड जेल पुरेसे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

लग्न समारंभ असो, सण असो किंवा घरातला एखादा कार्यक्रम, स्त्रिया सुंदर मेकअप आणि हेअर स्टाईल करून तयार होतात. कामानिमित्त बाहेर पडतानाही चेहऱ्यावर हलकासा मेकअप कायमच केला जातो. बऱ्याच स्त्रिया मेकअप केल्याशिवाय घरातून बाहेरच पडत नाहीत. मेकअपमुळे सौंदर्यात भर पडते, आत्मविश्वास वाढतो आणि चेहरा आकर्षक दिसतो.

पण दिवसभर चेहऱ्यावर राहिलेला मेकअप रात्री स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. तो काढला नाही, तर छिद्रांमध्ये घाण जमा होते आणि पिंपल्स, ऍक्ने किंवा अकाली सुरकुत्या येऊ शकतात. कामाच्या धावपळीत अनेकदा स्त्रिया मेकअप काढायला विसरतात, आणि त्याचा त्वचेला खूप जास्त त्रास होतो.

झोपण्यापूर्वी मेकअप काढला नाही, तर मेकअपचे बारीक कण आणि रासायनिक घटक त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये अडकून बसतात. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. मग चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुम, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स येतात आणि त्वचा निस्तेज होते. म्हणूनच मेकअप काढण्यासाठी नेहमी महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी स्वयंपाकघरात असलेले पदार्थ वापरावेत. यामुळे मेकअप सहज निघतो आणि त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.

घट्ट फाऊंडेशन, वॉटरप्रूफ मस्करा, लिपस्टिक आणि आयलाइनर काढायला खोबरेल तेल वापरावे. खोबरेल तेलातील नैसर्गिक घटकांमुळे त्वचेवरचा मेकअप सहज निघतो. हवे असल्यास बेबी ऑईलही वापरता येते. स्वच्छ कॉटन पॅडवर तेल घेऊन ते संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवावे. तेल फक्त मेकअपच काढत नाही, तर त्वचेवर साचलेली घाणही साफ करायला मदत करते. मात्र मेकअप काढल्यानंतर फक्त तेलावर अवलंबून राहू नये, फेसवॉश करणेही तितकेच आवश्यक आहे.

कोरफड त्वचेसाठी वरदान मानली जाते. कोरफड जेल त्वचेच्या असंख्य समस्या कमी करायला मदत करते. त्वचा थंड आणि कायम फ्रेश ठेवण्यासाठी त्याचा वापर करावा. हातांवर कोरफड जेल घेऊन ते संपूर्ण चेहऱ्यावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज करावा. काही सेकंदांतच मेकअप वितळून जातो. त्यानंतर टिश्यू पेपरने किंवा कॉटन पॅडने चेहरा पुसून घ्यावा. कोरफड जेलमुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारची जळजळ होत नाही आणि त्वचा फ्रेश दिसते.

मेकअप काढताना त्वचेची योग्य काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्वचा जोरजोरात घासू नये. चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी मेकअप काढल्यानंतर फेसवॉश करणे फारच आवश्यक आहे. चेहरा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तो कोरडा करून घ्यावा. यामुळे रोमछिद्रांमध्ये उरलेली घाण किंवा केमिकल्स पूर्णपणे निघून जायला मदत होते आणि चेहरा फ्रेश दिसतो.

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ