मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

राजुऱ्यात सहायक पोलीस निरीक्षकाची मुजोरी, धानोरकरांची एसपींकडे कारवाईची मागणी

राजुरा पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यावर नगरसेवक आणि नागरिकांना शिवीगाळ, मारहाण केल्याचा आरोप. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली.

राजुऱ्यात सहायक पोलीस निरीक्षकाची मुजोरी, धानोरकरांची एसपींकडे कारवाईची मागणी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यावर नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी अरेरावी केल्याचा तसेच अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर येताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

हे प्रकरण १९ सप्टेंबर २०२६ रोजी घडले. राजुरा नगर परिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला मोकडे यांच्या मुलाच्या कौटुंबिक वादाची चौकशी करण्यासाठी राजुरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष हरजीत सिंह संधू पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी त्यांच्याशी अरेरावी आणि अपमानास्पद भाषेत बोलल्याचा आरोप आहे. यानंतर मंगला मोकडे यांचा मुलगा कुणाल मोकडे याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचंही सांगितलं जातं. एवढ्यावरच न थांबता लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांबद्दलही अत्यंत अश्लील आणि गलिच्छ भाषा वापरून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा अनादर केल्याचा आरोपही या अधिकाऱ्यावर आहे.

याशिवाय, राजुरा पोलीस स्टेशनमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मिसिंग तक्रारीची नोंद आहे. या मुलीच्या शोधाबाबत विचारपूस करण्यासाठी आलेल्या तिच्या गरीब विधवा आईला कोणतीही मदत न करता उलट अपमानास्पद शब्द वापरून जबाबदारी झटकल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. एका असहाय्य विधवा महिलेला आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याऐवजी अशा पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याची टीका खासदार धानोरकर यांनी केली.

पोलीस प्रशासनाकडून सामान्य जनतेला आणि लोकप्रतिनिधींना अशीच वागणूक मिळत राहिली, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला. संबंधित अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा आणि शिस्तभंगाच्या नियमांनुसार तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. प्रशासनाने या प्रकरणात दिरंगाई केल्यास काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना धानोरकर यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा कुंदा जेनेकर, राजुरा तालुका अध्यक्ष रंजन लांडे, राजुरा बाजार समितीचे सभापती संतोष इंदुरवार, राजुरा शहर अध्यक्ष हरजीत सिंह संधू, कार्याध्यक्ष संघपाल देठे, नगरसेवक एजाज अहमद, राजुरा नगर परिषदेच्या सभापती पूनम गिरसावळे, नगरसेविका इंदुबाई निकोडे, अनुताई हरजीत सिंह संधू, मंगला मोकडे, कविता उपरे, तसेच सुमित्रा कुचनकर, सोनाली भगत, कुणाल मोकडे आणि रोहित बत्ताशंकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ