मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:00 IST

पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून 5 कोटींची खंडणी मागितली; 25 लाख घेताना प्रकार उघड

पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून 5 कोटींची खंडणी मागितली; 25 लाख घेताना प्रकार उघड छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पिंपरीतील एमआयडीसी भोसरी भागात एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कंपनीला महाराष्ट्रात काम करायचे असेल तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी थेट धमकीच आरोपींनी दिली होती. एवढेच नाही तर कंपनीची कागदपत्रे आपण काढून घेतल्याचा खोटा दावाही आरोपींनी केला होता आणि याच दाव्याच्या जोरावर व्यावसायिकावर दबाव टाकण्यात आला.

या धमकीच्या प्रकरणात कंपनीला वाट लावण्याची आणि जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती. या दबावाखाली संबंधितांकडून तब्बल 25 लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आरोपींवर आहे. या संपूर्ण प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत नेलविन पालमट्टम वर्गिस (वय 51, राहणार प्लॉट नं. 62, सेक्टर नं. 26, प्राधिकरण, निगडी, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय 38, व्यवसाय समाजकार्य, राहणार चिंतामणी चाळ, गांधीनगर, पोखरण रोड नं. 2, ठाणे पश्चिम) आणि अल्ताफ उस्मान जानवेकर (वय 53, व्यवसाय समाजकार्य, ठाणे पश्चिम) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय रमेश भिमा मांजरेकर (वय 39, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, ठाणे पश्चिम) आणि सुनील राजेंद्र कानू (वय 35, व्यवसाय कारवॉश, ठाणे पश्चिम) यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चौघांपैकी सुनील कानू याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकीच्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

अशाच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी पुणे शहरातही घडली होती. सदाशिव पेठ भागात एका हॉटेलचे केटरिंगचे कंत्राट टिकवून ठेवण्याच्या बदल्यात व्यावसायिकाला धमकावून 37 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये नागेश खाशाबा नलावडे (वय 53), उमाकांत रामचंद्र वालगुडे (वय 56), दिपक केशवराव धुमाळ (वय 65, तिघेही राहणार कोथरूड, पुणे), गणेश रत्नाकर भोज (वय 53, राहणार भिमपुरा कॅम्प), दिनेश अरुण खोडके (वय 49), राजन शंकर कामठे (वय 58, राहणार फुरसुंगी) आणि नितीन हरिभाऊ वाघमारे (वय 52, राहणार मंगळवार पेठ) यांचा समावेश असून या सर्वांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ