मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:37 IST

फोनमधले लपवलेले ॲप्स शोधायचेत? प्ले स्टोअर आणि सेटिंगमधून असा लावा छडा

मुलं किंवा पार्टनरने फोनमध्ये एखादा ॲप लपवला असेल, तर तो शोधण्यासाठी अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीत सोप्या पद्धती आहेत.

फोनमधले लपवलेले ॲप्स शोधायचेत? प्ले स्टोअर आणि सेटिंगमधून असा लावा छडा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

आपल्या फोनमधला एखादा ॲप लपवून ठेवणं हे अनेकांना सोयीचं वाटतं. महत्त्वाचे किंवा प्रायव्हेट ॲप्स दुसऱ्यांच्या नजरेपासून दूर ठेवण्यासाठी हे फिचर उपयोगी पडतं, हे खरं. पण हेच फिचर काही वेळा डोकेदुखी बनू शकतं. खासकरून पालकांसाठी. कारण घरातली लहान मुलं पालकांच्या नकळत हेच फिचर वापरून काही ॲप्स लपवतात आणि मग तेच ॲप्स गुपचूप वापरत राहतात. यातले काही ॲप्स मुलांसाठी धोकादायकही ठरू शकतात.

तुमची मुलं तुमच्या नकळत असे कुठले हिडन ॲप्स वापरत असतील अशी शंका असेल, तर ते शोधून काढण्याचे दोन सोपे मार्ग आहेत. एक म्हणजे थेट ॲप स्टोअरमध्ये जाऊन बघणं आणि दुसरा म्हणजे फोनच्या सेटिंगमधून तपासणं.

अँड्रॉइड फोन वापरत असाल तर सगळ्यात आधी गूगल प्ले स्टोअर उघडा. एखादा ॲप होम स्क्रीन किंवा ॲप ड्रॉवरमधून लपवलेला असला, तरी तो साइडलोड केलेला नसेल तर प्ले स्टोअरवर तो दिसतोच. यासाठी प्ले स्टोअर उघडून उजव्या कोपऱ्यातल्या प्रोफाईलवर क्लिक करा. तिथून मॅनेज ॲप्स अँड डिव्हाइसेस या ऑप्शनवर जा आणि मॅनेज टॅब निवडा. सगळ्यात वर 'डिव्हाइस' सिलेक्ट केल्याची खात्री करून घ्या, म्हणजे फोनवर इन्स्टॉल असलेल्या सगळ्या ॲप्सची यादी समोर येईल.

आयफोन वापरणाऱ्यांसाठी पद्धत थोडी वेगळी आहे. आधी ॲप स्टोअर उघडून स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करायचं. तिथे Your Apps हा ऑप्शन निवडला की मोबाईलमध्ये डाउनलोड झालेल्या सगळ्या ॲप्सची लिस्ट दिसते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ज्या ॲप्सवर 'ओपन' बटण दिसतं तेच ॲप्स सध्या फोनवर इन्स्टॉल आहेत असं समजायचं. ज्या ॲप्सवर 'डाउनलोड' बटण दिसतं ते ॲप्स आधीच अनइन्स्टॉल केलेले असतात.

याशिवाय ऑफिशियल ॲप स्टोअरखेरीज, फोनच्या सेटिंगमधल्या ॲप लिस्टमध्येही लपवलेले ॲप्स शोधता येतात. इथे फोनवर सध्या इन्स्टॉल असलेले सगळे ॲप्स दिसतात, अगदी मुद्दाम लपवलेले ॲप्ससुद्धा. फोन कंपनीनुसार ही पद्धत थोडी बदलते. गूगल पिक्सेल किंवा मोटोरोला फोन असेल तर सेटिंग उघडून ॲप्स ऑप्शनवर जा आणि वरच्या बाजूला असलेला सी ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. सैमसंग फोन असेल तर सेटिंगमध्ये जाऊन ॲप्स ऑप्शन निवडा, मग फिल्टर आयकॉनवर क्लिक करून इंस्टॉल बाय यू हा ऑप्शन सिलेक्ट करा. इथे डाउनलोड केलेल्या ॲप्सची लिस्ट दिसते.

आयओएसवर मात्र हिडन ॲप्स 'ॲप्स' या पेजवर लगेच दिसत नाहीत. ते 'हिडन ॲप्स' या वेगळ्या मेनूमध्ये लपवलेले असतात. हे ॲप्स 'ॲप लायब्ररी'च्या खाली असलेल्या 'हिडन ॲप्स' फोल्डरमध्येही सापडू शकतात. मात्र हे ॲप्स उघडण्यासाठी फेस आयडी किंवा पासकोड द्यावा लागतो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ