मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:46 IST

कर्जतमध्ये थोरवेंची हॅट्ट्रिक होणार, पालकमंत्री गोगावलेंचा 2029 आधीच दावा

रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे 2029 मध्येही याच मतदारसंघातून आमदार होतील असा दावा केला.

कर्जतमध्ये थोरवेंची हॅट्ट्रिक होणार, पालकमंत्री गोगावलेंचा 2029 आधीच दावा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून त्यामुळे 2029 च्या निवडणुकीतही तेच कर्जतचे आमदार असतील, असा दावा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पोसरी येथील निवासस्थानी गणेश दर्शनासाठी गोगावले आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी हा दावा त्यांनी केला.

आमदार थोरवे यांच्या घरी पोहोचलेल्या पालकमंत्री गोगावले यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, त्यांचे लहान बंधू विश्वनाथ थोरवे आणि ॲड. संकेत भासे यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोगावले यांनी गणरायाची पूजा करणाऱ्या थोरवे कुटुंबाला आणखी बळ मिळो आणि त्यांचा मतदारसंघ आणखी सुरक्षित होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

खासदार सुनील तटकरे यांच्याकडे गणेश दर्शनाला गेल्याने महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे नाराज असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, त्यांची मनधरणी करण्यासाठीच गोगावले आले आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर गोगावले यांनी हे दोघेही आपली माणसे असल्याचे सांगत, त्यांच्या घरासमोरून जाताना बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेलो, यापलीकडे दुसरे काही कारण नसल्याचे स्पष्ट केले. या दोघांची ही दुसरी टर्म असून त्यांची हॅट्ट्रिक होणार हे कोणीही रोखू शकत नाही आणि त्यासाठी देव आताच पाण्यात ठेवला तरी हरकत नाही, असेही गोगावले म्हणाले. आपण कधीही चुकीचा सल्ला देत नाही, त्यामुळे या दोघांनी आपल्यावर विश्वास ठेवावा आणि सबुरीने घ्यावे, त्यांची हॅट्ट्रिक कोणीही रोखू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

आपल्याला पालकमंत्रीपदावर बसवण्यासाठी महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी केलेले प्रयत्न कोणीही नाकारू शकत नाही आणि आपणही ते विसरू शकत नाही, असे गोगावले म्हणाले. त्यामुळेच या दोघांनी जेव्हा जेव्हा बोलावले तेव्हा तेव्हा आपण कर्जतला आलो आहोत, मागील वर्षीही आलो होतो आणि यावर्षीही आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

महायुतीतील नेत्यांची खालापूरमध्ये गुप्त बैठक झाली आणि त्या बैठकीला महेंद्र थोरवे यांना बोलावले नव्हते, या प्रश्नावर गोगावले यांनी उत्तर दिले की हॉटेलमध्ये बैठक झाली तर ती गुप्त असते, पण आपली भेट जाहीर होती. मात्र त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांना बोलावले नव्हते हे त्यांनी मान्य केले. पुढील बैठकीला रायगडचे दोन्ही खासदार आणि आपल्यासह दोन्ही आमदार असतील, असे गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ