मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:00 IST

पाचगावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा

राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे बेकायदा दारू विक्रीमुळे एका तरुणाच्या आत्महत्येची घटना घडल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी केली.

पाचगावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राजुरा तालुक्यातील पाचगाव या गावात बेकायदा दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची तक्रार समोर आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, राजुराचे सभापती तिरूपती मलय्याजी इंदुरबार यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना निवेदन देऊन येथील अवैध दारू विक्री तात्काळ थांबवावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. गावातील बिघडत चाललेल्या सामाजिक स्थितीची गंभीर दखल घेऊन सभापतींनी हे निवेदन दिले असून पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

पाचगाव परिसरात काही व्यक्ती बेकायदा पद्धतीने दारू विकत असल्याने गावातील सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः गावातील तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून त्याचा त्यांच्या तब्येतीवर, कौटुंबिक आयुष्यावर आणि एकंदर भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या अवैध विक्रीमुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचे आणि त्याचे दूरगामी परिणाम कुटुंबांना भोगावे लागत असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

या निवेदनात एका दुर्दैवी घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. २० सप्टेंबर २०२६ रोजी पाचगाव येथील रहिवासी कैलास संतोष तोडेतिवार (वय २१) या तरुणाने दारूच्या नशेत विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने संबंधित पोलीस अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी विनंती सभापती तिरूपती इंदुरबार यांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारची बेकायदा दारू विक्री पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. या निवेदनाची एक प्रत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांनाही देण्यात आली असून त्यांच्याकडूनही आवश्यक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनीही जिल्हा पोलीस अधीक्षकांना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच बेकायदा दारूची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सुचवले. गावातील शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासह युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदाताई जेनेकर, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, नगरसेवक एजाज अहमद, नगर पंचायत सभापती पूनम गिरसावळे, अन्नुताई संधू, नगरसेविका इंदुबाई निकोडे, मंगला मोकडे, पोर्णिमा सोयाम, सुमित्राबाई कुचनकर, संघपाल देठे, कुणाल मोकळे यांच्यासह राजुरा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ