सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 22:25 IST

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हुकमी एक्का परतणार; बुमराह आणि पंत भारत 'अ' संघाकडून खेळण्याची शक्यता

भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यातील तिसऱ्या अनौपचारिक कसोटीत जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार असल्याचे समजते आहे. ऋषभ पंतही खेळण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हुकमी एक्का परतणार; बुमराह आणि पंत भारत 'अ' संघाकडून खेळण्याची शक्यता छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी 20 मालिका सुरू असून त्यातले दोन सामने आधीच पूर्ण झाले आहेत. या दोन्ही सामन्यांनंतर भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. उद्या मालिकेतला तिसरा आणि महत्त्वाचा सामना होणार आहे. हा सामना भारताने जिंकला, तर मालिकाही भारताच्या खिशात जाणार आहे.

या सगळ्यात भारतीय चाहत्यांसाठी आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह मैदानावर परत येणार असल्याचे समजते आहे.

एकीकडे भारताचा मुख्य संघ न्यूझीलंडमध्ये खेळतो आहे, तर दुसरीकडे भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यात तीन सामन्यांची अनौपचारिक टेस्ट मालिका खेळवली जात आहे. सध्या या मालिकेतला पहिला सामना सुरू आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार असल्याचे समोर येत आहे. त्याच्यासोबत ऋषभ पंतही खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यातला हा तिसरा आणि शेवटचा अनौपचारिक कसोटी सामना ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या सामन्यात बुमराह आणि पंत दोघेही खेळण्याची शक्यता आहे. धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज असलेल्या पंतचे या सामन्यात खेळणे तर जवळपास निश्चित मानले जात आहे.

जागतिक क्रिकेटमधील अव्वल गोलंदाजांपैकी एक असलेला बुमराह बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरायला सज्ज झाला आहे. तिसऱ्या सामन्यात त्याचा समावेश झाल्यामुळे भारत 'अ' संघाची ताकद वाढणार आहे. तसेच पंत संघात सहभागी झाला, तर फलंदाजीलाही बळकटी मिळण्यास मदत होईल.

या दोन्ही स्टार खेळाडूंच्या पुनरागमनामुळे ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा हा तिसरा अनधिकृत कसोटी सामना चुरशीचा होणार आहे, असे चित्र आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट मालिकेचे वेळापत्रकही समोर आले आहे. पहिला कसोटी सामना १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. दुसरा कसोटी सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ