मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:26 IST

नवी मुंबईत बनावट प्रेस-पोलीस स्टिकर लावून वाहनांची बेकायदा वाहतूक

कोपरखैरणे परिसरात खाजगी गाड्यांवर बोगस 'प्रेस' आणि 'पोलीस' स्टिकर लावून नाकाबंदी टाळली जात असल्याचे उघड

नवी मुंबईत बनावट प्रेस-पोलीस स्टिकर लावून वाहनांची बेकायदा वाहतूक
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

नवी मुंबई शहरात, आणि खासकरून कोपरखैरणे भागात, बनावट 'प्रेस' म्हणजे पत्रकार आणि 'पोलीस' असे स्टिकर लावलेल्या खाजगी गाड्यांचा वापर करून बेकायदा कामे चालवली जात असल्याचं समोर आलंय. कोपरखैरणेतील बारमध्ये काम करणाऱ्या बारबालांना बारमध्ये सोडण्यासाठी आणि तिथून परत घरी आणण्यासाठी अशा गाड्या वापरल्या जातात, आणि त्यावर सर्रास 'प्रेस' किंवा 'पोलीस' असं लिहून शहरभर वाहतूक केली जाते.

काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे गावातील रांजणदेवी मंदिर परिसरात असाच एक प्रकार उघड झाला. MH 46 N 5612 या क्रमांकाच्या मारुती इको गाडीच्या मागच्या काचेवर स्पष्टपणे 'प्रेस' असं लिहिलेलं दिसलं. या गाडीतून बारबालांची ने-आण सुरू होती. इको, टाटा सुमो, क्वालीस, सेंट्रो अशा वेगवेगळ्या गाड्या वापरून ही 'सुरक्षित' वाहतूक सर्रासपणे चालते असं दिसून आलंय.

रात्रीच्या वेळी किंवा पोलिसांची नाकाबंदी असताना तपासणीतून सुटण्यासाठी या गाड्यांवर 'प्रेस' किंवा 'पोलीस' स्टिकर चिकटवले जातात. असं स्टिकर पाहून पोलीस अनेकदा गाडी न अडवताच सोडून देतात, आणि याचाच फायदा गाडी चालवणारे आणि बार मालक घेत असल्याचं समोर आलंय. यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, नावालाच चालणाऱ्या काही 'साप्ताहिक' वर्तमानपत्रांचे संपादक अवघ्या ५०० ते १०,००० रुपयांसाठी अशा चालकांना थेट वृत्तपत्राचं अधिकृत ओळखपत्र बनवून देतात. हे बनावट आयकार्ड दाखवून नाकाबंदीत पोलिसांवर दबाव टाकला जातो.

पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते, पण अशा प्रकारे 'प्रेस' या शब्दाचा आणि स्टिकरचा गैरवापर बेकायदा कामांसाठी होत असल्यामुळे खऱ्याखुऱ्या, प्रामाणिक पत्रकारांची प्रतिमा मलीन होत असल्याचं दिसतंय. गाव-गल्लीत, मंदिर परिसरात आणि रहिवासी भागात अशा संशयास्पद गाड्या उभ्या राहिल्यामुळे स्थानिक लोकांमध्येही भीती आणि संभ्रमाचं वातावरण तयार होत आहे.

भविष्यात अशा गाड्यांमधून एखादी गंभीर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल नवी मुंबईतील नागरिक विचारत आहेत. आरटीओ आणि नवी मुंबई पोलिसांनी याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. गाडीच्या काचेवर बेकायदेशीर 'प्रेस' किंवा 'पोलीस' लिहून नियमबाह्य पिकअप-ड्रॉप करणाऱ्या गाड्यांवर त्वरित जप्तीची कारवाई व्हावी, तसंच पैशांसाठी बनावट आयकार्ड वाटणाऱ्या साप्ताहिक संपादकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अशा बोगस स्टिकरधारी गाड्यांवर आणि त्यांच्या आडून चालणाऱ्या बेकायदा धंद्यांवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय काय पावलं उचलणार, याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ