मुशीर खानचं हरियाणाविरुद्ध शतक आणि ६ विकेट, वडील नौशाद यांचा व्हिडीओ व्हायरल
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी खेळताना मुशीर खानने हरियाणाविरुद्ध शतक ठोकलं आणि ६ विकेटही घेतल्या. त्याचवेळी वडील नौशाद खान यांचा ट्रेनिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतोय.
मुंबईच्या क्रिकेटमध्ये नौशाद खान हे नाव माहीत नाही, असा माणूस सापडणार नाही. सरफराज खान आणि मुशीर खान या दोन मुलांचे वडील आणि कोच म्हणून लोक त्यांना ओळखतात. नौशाद खान यांचं स्वतःचं टीम इंडियात खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. ते स्वप्न त्यांनी मोठा मुलगा सरफराजमध्ये पाहिलं आणि सरफराजने ते खरं करून दाखवलं.
आता धाकटा मुलगा मुशीर खानही त्याच वाटेवर आहे. मुंबईसाठी रणजी ट्रॉफीत खेळताना त्याने नुकताच ३५ वर्षं जुना रेकॉर्ड मोडला. हरियाणाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने आधी सेंच्युरी मारली आणि नंतर बॉलिंग करताना ६ विकेट घेतल्या. असं करणारा तो मुंबईचा सहावा खेळाडू ठरला आहे. एकाच रणजी मॅचमध्ये शंभर रन आणि ५ पेक्षा जास्त विकेट घेणं सोपं नसतं. याआधी हे रवी शास्त्री यांनी १९९० साली केलं होतं. म्हणजे ३५ वर्षांनंतर मुशीरने तोच रेकॉर्ड मोडला आहे. आता तर तो थेट टीम इंडियाचे दरवाजे ठोठावतोय.
याच दरम्यान नौशाद खान यांचा एक ट्रेनिंगचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. त्यात ते आपल्या मुलाला, मुशीरला, बॅटिंग शिकवताना दिसतात. ते म्हणतात, "जेव्हा तू मिडियम पेसरला खेळतो, तो साईड आर्म बॉलर असतो... साईड आर्मने जेव्हा बॉल येतो, तेव्हा तू खूप आधी पोझिशन घेतली पाहिजे. त्यामुळे तुला एक्स्ट्रा टाइम मिळतो. इथे तुला फ्रंटफूटवर जाता येणार नाही. मिडियम पेसरला फक्त मनगट फिरवायचं असतं." ऐकायला हे सोपं वाटतं, पण त्यामागे किती वर्षांची मेहनत आहे, ते व्हिडीओत दिसतं. एक बाप आपल्या मुलाला प्रत्येक बारीक गोष्ट समजावून सांगतोय.
नौशाद खान यांनी दोन्ही मुलांना मुंबईच्या आझाद मैदानावर घडवलं. ऊन असो वा पाऊस, त्यांनी रोज कडक शिस्तीत प्रॅक्टिस करून घेतली. खायला-प्यायला काही नसायचं, असे खडतर दिवस त्यांनी काढले. तरीही बापाने हार मानली नाही.
सरफराजला पहिल्यांदा टीम इंडियाची टेस्ट कॅप मिळाली, तेव्हा मैदानावर उभे असलेले नौशाद खान रडले होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. ते अश्रू फक्त आनंदाचे नव्हते, तर वर्षानुवर्षं केलेल्या मेहनतीचे होते.
आज सरफराज टीम इंडियात आहे आणि मुशीर रणजी गाजवतोय. पण या दोघांच्या मागे उभा असलेला खरा माणूस म्हणजे नौशाद खान. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून मुलांना घेऊन जाणारा आणि दिवसभर त्यांना थ्रो देणारा हा बाप आज खऱ्या अर्थाने जिंकला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.