मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:30 IST

मंचर बसस्थानकात महिलांचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक, सोने खरेदी करणाराही पोलिसांच्या

मंचर पोलिसांनी तिघांना अटक केली असून ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मंचर बसस्थानकात महिलांचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक, सोने खरेदी करणाराही पोलिसांच्या
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मंचर : राज्यात तसेच देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच बसस्थानक परिसरात गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या अंगावरील आणि पिशवीतील दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना आणि सोने खरेदी करणाऱ्या एकाला मंचर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे अशोक बबन भोसले (वय २८, रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड, सध्या रा. हिरडगाव), अश्विनी अविनाश भोसले (वय २६, रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि सतीश मधुकर गोरे (वय ५४, रा. शिवाजीनगर, जामखेड, जि. अहिल्यानगर) अशी आहेत.

मंचर बसस्थानकात एसटीमध्ये बसण्यासाठी चढत असताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या सूचनेनुसार संयुक्त तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने काम केले.

या गुन्ह्यांतील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला जात होता. हा शोध सुरू असताना २४ सप्टेंबर रोजी आरोपी मंचर बसस्थानकात आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने अशोक भोसले आणि अश्विनी भोसले यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोने खरेदी करणाऱ्या सतीश गोरे याला अटक करण्यात आली.

तपासात आरोपींनी मंचर, खेड आणि नारायणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ