कोरपना तालुक्यातील नारंडा येथे काँग्रेस, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
नारंडा येथील कार्यकर्ता मेळाव्यात आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे काल (दि. ४) कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.
लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगला बदल घडवून विकासाला गती देण्यासाठी भाजपा सरकार नेहमी प्रयत्नशील आहे, असे आमदार भोंगळे यांनी सांगितले. सर्वांगीण विकासासाठी जनता भाजपात येत आहे, असेही त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना आमदार भोंगळे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांसाठी राबवल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार नेहमी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार भोंगळे यांनी यावेळी दिली.
भाजपात प्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांना आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात त्यांचे स्वागत केले.
प्रवेश केलेल्यांमध्ये नारंडा येथील माजी ग्रा. पं. सदस्य मारोती पोटदुखे, माजी सरपंच राजू खाडे, बंडू बोढे, कालिफनाथ लांडगे, सुनील खोके, दादाजी तिखट, भाऊजी पोटदुखे, सुदाम मालेकर, विजय पोटदुखे, विलास पोटदुखे, रवींद्र पोटदुखे, पद्माकर आत्राम, पंढरी निमकर, धनराज कोंगरे, मारोती कारेकर, गजानन तिखट यांच्यासह मोठ्या संख्येने इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यात संजय बोढे, विजय बोढे, विकास सिडाम, बालाजी कोडापे, सुरेश आत्राम, संजय तलांडे, प्रवीण आत्राम, पांडुरंग कोडापे, महादेव टेकाम, अनिल आत्राम, रमेश मडावी, रामदास कुमरे, नानाजी आत्राम, गणपत कुमरे, सुभाष मडावी, रूपचंद चौधरी, गणेश कावळे, अक्षय गोहोकर आणि शुभम सहारे ही नावेही आहेत.
आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले आहे, आम्ही विकासासाठी भाजपात प्रवेश करत आहोत, अशी भावना नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री अरुण रागीट, सरपंच अनुताई ताजने, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री आशिष ताजने, उपसरपंच बाळा पावडे, वसंतराव ताजने, गडचांदूर न. प. नगरसेवक सतीश बेतावार, मोरेश्वर आस्वले, निमणीचे सरपंच अतुल धोटे, अशोक झाडे, शशिकांत आडकिने, अविनाश वाभीटकर, संजय पिंपळशेंडे, नैनेश आत्राम, दिलीप पाचभाई, सचिन बोंडे, नागोबा उरकुडे, सुरेश परसूटकर, महादेव खाडे, निखिल भोंगळे, सचिन आस्वले, विशाल अहिरकर, मंजुषा ताजने आणि रुपाली भोंगळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.