बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:48 IST

प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी ५ कोटी घेतल्याचा आरोप, विराट कोहलीच्या टीमने फेटाळला

फलाहारी बाबा दिनेश शर्मा यांच्या आरोपावर कोहलीच्या टीमने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून, आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे सांगून प्रसारमाध्यमांनाही आवाहन केले आहे.

प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी ५ कोटी घेतल्याचा आरोप, विराट कोहलीच्या टीमने फेटाळला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यावर फलाहारी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिनेश शर्मा यांनी गंभीर आरोप केला आहे. वृंदावनचे प्रेमानंदजी महाराज यांना भेटण्यासाठी कोहलीने ५ कोटी रुपये घेतले होते, असा दावा फलाहारी बाबांनी केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर हे आरोप आधीपासूनच खोटे असल्याचे सांगून फेटाळले जात होते. आता विराट कोहलीच्या टीमने या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे टीमने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. तसेच टीमने प्रसारमाध्यमांनाही एक आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोहलीवर ५ कोटी रुपये घेऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेतल्याचे आरोप केले जात आहेत. त्यावर पहिली प्रतिक्रिया देताना कोहलीच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे, 'आम्ही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की, फलाहरी महाराज दिनेश शर्मा यांनी श्री. विराट कोहली यांच्याबाबत केलेले दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहेत. विराट कोहली हे केवळ त्यांच्या श्रद्धा आणि भक्तीच्या भावनेतून प्रेमानंद महाराजजींना भेटतात.'

फलाहारी बाबांनी आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि काही क्षणांतच या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरू लागल्या. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले. तेव्हापासून कोहलीच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांना केलेल्या एका मोठ्या आवाहनात विराटच्या टीमने म्हटले आहे, 'आम्ही हे दावे पूर्णपणे फेटाळून लावतो आणि प्रसारमाध्यमांना आवाहन करतो की, अशी विधाने प्रकाशित करण्यापूर्वी किंवा प्रसारित करण्यापूर्वी त्यांनी तथ्यांची योग्य चौकशी व पडताळणी करावी आणि जबाबदारीने रिपोर्टिंग करावे.'

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी २०२३ मध्ये पहिल्यांदा प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. तेव्हापासून किंग कोहली जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वृंदावनला जात असतो. या दौऱ्यांमध्ये त्याने आपली मुलगी वामिका आणि मुलगा अकाय कोहली यांनाही सोबत नेले होते. याशिवाय विराटने बाबा नीम करोली यांच्या आश्रमालाही भेट दिली आहे.

क्रिकेटच्या आघाडीवर पाहिले तर, विराट कोहली नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आता तो न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ ४ नोव्हेंबरपासून पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत कोहलीकडून पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. मागील मालिकेतही त्याने एक शानदार शतक झळकावले होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ