मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:59 IST

केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी माहिती: सिया आणि चेतनने केतनला दुसऱ्या राज्यात नेऊन हात-पाय तोडण्याचा विचार

पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात नियोजित वधू सिया गोयल हिला लग्न करायचे नव्हते, असे तपासात पुढे आले आहे. ५३०० पानांच्या दोषारोपपत्रात पोलिसांनी जबाब आणि डिजिटल पुरावे नोंदवले आहेत.

केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी माहिती: सिया आणि चेतनने केतनला दुसऱ्या राज्यात नेऊन हात-पाय तोडण्याचा विचार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पुणे : राज्यभर गाजलेल्या केतन अगरवाल (वय २५) या व्यावसायिकाच्या हत्याप्रकरणात आता नवी माहिती समोर येत आहे. केतनची नियोजित वधू सिया गोयल हिला त्याच्याशी लग्नच करायचे नव्हते, असे तपासात पुढे आले आहे. तिने ही गोष्ट अनेक मित्र-मैत्रिणींना बोलून दाखवली होती, असेही तपासात समोर आले आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे, हत्येआधी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी केतनला दुसऱ्या राज्यात नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याचाही विचार केला होता. मात्र दुसऱ्या राज्यातील एका मित्राने याला विरोध केला आणि तो विचार तेव्हा तिथेच थांबला.

आरोपींच्या या विचारासंदर्भात रितेश हंगे याच्या कर्नाटकातील बंगळुरू येथील एका मित्राशी बोलणेही झाले होते, असे तपासात समोर आले. त्या मित्राने या प्रकाराला विरोध केला. "तुम्ही वेडे आहात का, असे काही करू नका," असा सल्ला त्याने दिला होता. पोलिसांनी दुसऱ्या राज्यातील या मित्राचा जबाब नोंदवला आहे आणि तो दोषारोपपत्रात समाविष्ट आहे.

पोलिसांनी तपासात सोशल मीडिया आणि डिजिटल पुराव्यांचीही पडताळणी केली. आरोपी चेतन याने इन्स्टावर "माही" नावाने एक खाते उघडले होते. त्या खात्यासंदर्भातील डिजिटल पुरावेही पोलिसांनी गोळा केले आहेत.

केतनशी लग्न करायची इच्छा नसल्याचे सियाने ज्यांच्याकडे बोलून दाखवले होते, त्या सर्वांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. हत्याकांडानंतर पोलिसांनी संशयित व्यक्ती, त्यांचे संपर्क, घटनाक्रम, डिजिटल पुरावे आणि इतर उपलब्ध पुरावे यांच्या आधारे तपास पुढे नेला. या सगळ्या गोष्टींची सांगड ५३०० पानांच्या दोषारोपपत्रात घालण्यात आली आहे. न्यायालयीन सुनावणीत हे पुरावे किती ग्राह्य धरले जातात आणि त्यावर कोणती साक्ष होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोषारोपपत्रातील पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब न्यायालयीन प्रक्रियेत मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी पक्षाकडे असणार आहे.

सियाचे तिच्या मित्रासोबतचे एक चॅट सध्या व्हायरल होत आहे. त्यात "लग्न तसेही होणार नाही..." अशी एक ओळ लिहिलेली आहे. या एका ओळीमुळे केतन अगरवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पोलीस या चॅटचा तपास करत आहेत.

पोलिसांनी सुरुवातीला सांगितले होते की, दोन्ही आरोपी दीड महिन्यापासून सराव करत होते. त्यानंतर तपासात सांकेतिक शब्दांचा वापर उघड झाला होता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ