मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:21 IST

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाला नवव्यांदा विजेतेपद

विक्रोळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत संदेश कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा १० गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळवले, तर मुलींच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला.

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाला नवव्यांदा विजेतेपद
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या वतीने नुकतीच विक्रोळी येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. १९ वर्षांखालील मुले आणि मुली अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली. कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली या तालुक्यांतील प्रत्येकी पहिल्या दोन क्रमांकांचे संघ या स्पर्धेत उतरले होते. या स्पर्धेत संदेश कनिष्ठ महाविद्यालयाने दुहेरी यश मिळवले आहे.

कुर्ला तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे संदेश विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथे आहे. या कॉलेजच्या मुलांच्या संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अप्रतिम खेळ केला. त्यांनी कांदिवलीच्या ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा १० गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. कनिष्ठ महाविद्यालयाने जिल्ह्याचे विजेतेपद जिंकण्याची ही नववी वेळ आहे.

या संघातील विश्वजीत राजाराम पाटील, विवेक जगन्नाथ चोरघे, चेतन दीपक सणस, आर्यन जितेंद्र मोरे, शिवांश गजानन मगर, सागर संतोष धाडवाड, साहिल उदयराज यादव, आर्यन विठ्ठल वाघमारे, साई सुनील खोपकर, हर्ष शिवकुमार सिंग, शुभम संदीपान महानवर आणि प्रतीक प्रवीण मोरे यांची निवड झाली आहे. ठाणे येथे होणाऱ्या मुंबई विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी हे खेळाडू जाणार आहेत.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटातही कॉलेजच्या संघाने चांगली कामगिरी केली. या संघाने बाफना ज्युनियर कॉलेजचा पराभव करून तृतीय क्रमांक मिळवला. या संघात वैष्णवी बबन दुरगुडे, आयुषी श्यामसुंदर कनोजिया, श्रुतिका संतोष पार्ट, अमरीन अय्युब शेख, पल्लवी सिद्धार्थ जाधव, शर्वरी प्रदीप लांबे, सृष्टी सतोष साळवी, श्वेता संतोष देशमाने, देवयानी दीपक कांबळे, वैदही अमित कदम, सिद्धी संतोष शेळके आणि कृष्णा नीलेश भंडारे यांचा समावेश होता.

यशस्वी विद्यार्थ्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे. मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव, कुर्ला तालुका क्रीडा अधिकारी ऋतुजा कडलगे, संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता म्हात्रे, विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मेघा म्हात्रे यांनी या विद्यार्थ्यांचे तसेच क्रीडा शिक्षक शिवाजी कालेकर, सुनील तांबे आणि सचिन पाष्टे यांचे अभिनंदन केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ