मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:54 IST

ED च्या दोन अधिकाऱ्यांकडून मुंबईतील व्यापाऱ्याला अटकेची धमकी देऊन 2.25 कोटींची खंडणी

जयपूरच्या दोन ED अधिकाऱ्यांवर मुंबईतील व्यावसायिकाला अटक आणि कारवाईची भीती दाखवून पैसे उकळल्याचा आरोप, गोरेगावच्या बांगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

ED च्या दोन अधिकाऱ्यांकडून मुंबईतील व्यापाऱ्याला अटकेची धमकी देऊन 2.25 कोटींची खंडणी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांच्या कारवाया गेल्या काही वर्षांत नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. पण यावेळी मुंबईत या यंत्रणेच्याच दोन अधिकाऱ्यांवर उलट खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) दोन अधिकाऱ्यांनी मुंबईतील एका व्यावसायिकाला कारवाई आणि अटकेची भीती दाखवत तब्बल 2.25 कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात जयपूर येथे तैनात असलेल्या ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता अशी या दोघांची नावं आहेत. गोरेगावमधील बांगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवण्यात आली असून, प्रकरणाचं गांभीर्य पाहता पुढचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

मुंबईतील 'विंट्री टेक' या कंपनीचे मालक अमूल्य वस्सा यांच्या तक्रारीनुसार, 20 जुलै रोजी जयपूर ईडीचे सहाय्यक संचालक मोहित गर्ग आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता हे मालाड इथल्या त्यांच्या कार्यालयात गेले होते. तिथे कोणतीही कायदेशीर कागदपत्रं न दाखवता या दोघांनी वस्सा यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यांचं कार्यालय सील करण्याची तसंच त्यांना अटक करण्याची धमकी दिली, असं तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अधिकाऱ्यांनी सुरुवातीला वस्सा यांच्याकडे 5 कोटी रुपयांची लाच मागितली होती आणि पैसे न दिल्यास कठोर कारवाई करण्याची धमकीही दिली, असा आरोप वस्सा यांनी केला आहे. शेवटी 2.25 कोटी रुपयांवर तडजोड झाल्याचं तक्रारीत नमूद आहे. त्याच संध्याकाळी वस्सा आणि त्यांचे भागीदार आरोपी अधिकाऱ्यांना मालाडमधील एका रेस्टॉरंटमध्ये भेटले आणि चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी वस्सा यांनी 1 कोटी रुपये आरोपींच्या हवाली केले, असा दावा करण्यात आला आहे.

वस्सा यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पहिला हप्ता मिळाल्यानंतर गर्ग आणि गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण बंद केल्याचं सांगितलं. पण प्रकरण बंद केल्याची कागदपत्रं मागितली असता, फाईलची सत्यता फक्त दिल्लीतच तपासता येईल, असं उत्तर देण्यात आलं. त्यानंतर 25 जुलै रोजी वस्सा यांच्या दोन सहकाऱ्यांनी दिल्लीतील एका मॉलमध्ये आरोपी अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिथे आरोपींनी प्रकरण मिटवल्याची कथित बनावट कागदपत्रं दाखवली आणि त्यानंतर उरलेले 1.25 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.

2.25 कोटी रुपये मिळाल्यानंतरही आरोपींची पैशांची मागणी थांबली नाही, असं तक्रारीत म्हटलं आहे. वरिष्ठ अधिकारी नाराज असून त्यांना आणखी पैसे द्यावे लागतील, असं सांगत आरोपींनी अतिरिक्त रक्कम आणि दरमहा नियमित हप्त्याचीही मागणी केली. या सततच्या मागणीमुळे संशय आल्याने वस्सा यांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली आणि ओळखीच्या सूत्रांकडून चौकशी केली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं, असा दावा करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता हे दोघेही ईडीचे अधिकारी असल्याचं स्पष्ट झालं असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आपल्या पदाचा आणि ईडीच्या अधिकारांचा गैरवापर करून कट रचला, व्यावसायिकाला धमकावलं आणि 2.25 कोटी रुपयांची खंडणी उकळली, असा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू असून, आरोपांची सत्यता आणि कथित आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ