मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

हिंगणघाटच्या दारुविक्रेत्याची एमपीडीए कायद्याखाली नाशिकरोड कारागृहात रवानगी

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात दारुविक्रेत्याला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा आदेश देत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पाठवले.

हिंगणघाटच्या दारुविक्रेत्याची एमपीडीए कायद्याखाली नाशिकरोड कारागृहात रवानगी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीतील शेख अफसर उर्फ डिंग्या शेख असलम (वय ३४, रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) या दारुविक्रेत्या इसमाला महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफिया व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) म्हणजेच एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा श्रीमती वान्मथी सी. यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी हा आदेश जारी केला असून त्यानुसार त्याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

शेख अफसर याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर सन २०१८ पासून शरीराविरुद्ध २ गुन्हे आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली २४ गुन्हे असे एकूण २६ गुन्हे नोंद आहेत. सन २०१८ पासून स्थानबद्ध असलेल्या या इसमाने हिंगणघाट पोलीस स्टेशन परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती, त्यामुळे अनेक पीडित त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासही धजावत नव्हते, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडून सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले होते. त्याच्या कृत्यांमुळे परिसरातील गुन्हेगारी गतिविधी थांबत नसल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१), (अ) (ब) अन्वये त्याला २० दिवसांसाठी वर्धा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते, तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १२९ (ई) अंतर्गत एक वर्षासाठी अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. मात्र या प्रतिबंधक कारवाईलाही तो जुमानत नव्हता आणि त्यानंतरही सतत गुन्हे करत राहिला, असे स्पष्ट करण्यात आले.

याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक अनिल राऊत, हिंगणघाट पोलीस स्टेशन यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक वर्धा सौरभ कुमार अग्रवाल यांच्यामार्फत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा आदेश जारी केला.

वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी आणि आगामी गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, दसरा, दिवाळी हे सण शांततेत पार पडावेत या उद्देशाने अवैधरीत्या दारू विकणाऱ्यांवर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींवर एमपीडीए कायद्याखाली कठोर कारवाई सुरूच राहील, असे संकेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आहेत.

सन २०२५ मध्ये एकूण १८ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एमपीडीए कायद्याखाली विविध कारागृहांत स्थानबद्ध करण्यात आले होते. सन २०२६ मध्ये आतापर्यंत ९ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना विविध कारागृहांत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक वर्धा सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशिलकुमार नायक आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल आत्राम, पोलीस हवालदार आशिष महेशगौरी (स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथे नेमणूक), पोलीस निरीक्षक अनिल राऊत आणि हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार प्रविण देशमुख, पोलीस अंमलदार संग्राम मुंडे, शिवशंकर यादव, संतोष लोहटे व शुभम गावंडे यांनी पार पाडली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ