मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:31 IST

डीएसपी क्रिकेट लीग: पवन आनंदच्या नाबाद ७८ धावांनी साई सत्यमला दणदणीत विजय

वाघोलीतील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या डीएसपी करंडक मान्सून लीगमध्ये साई सत्यम, ईगल्स आणि पुणेरी क्रिकेट क्लब या तीन संघांनी विजय मिळवले.

डीएसपी क्रिकेट लीग: पवन आनंदच्या नाबाद ७८ धावांनी साई सत्यमला दणदणीत विजय
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटसतर्फे आयोजित 'डीएसपी करंडक मान्सून लीग' या मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत बुधवारी तीन लढती पार पडल्या. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यांमध्ये साई सत्यम क्रिकेट क्लब, ईगल्स क्रिकेट क्लब आणि पुणेरी क्रिकेट क्लब या तीनही संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली.

पहिल्या लढतीत साई सत्यम क्रिकेट क्लबने गोल्डन क्रिकेट क्लबला ९१ धावांनी लोळवले. आधी फलंदाजीला उतरलेल्या साई सत्यम संघाने २० षटकांत ६ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. यात पवन आनंदने ४८ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७८ धावांची खेळी उभी केली. त्याला विक्रांत दुबेने २६ आणि सागर भापकरने १८ धावांची साथ दिली. गोल्डन क्लबकडून गणेश खांडवेने २ तर नवीन कुमारने १ फलंदाज बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना गोल्डन क्रिकेट क्लबचा डाव अवघ्या १५.१ षटकांत ७१ धावांत आटोपला. महेश दादाने १९, रोहन चौरसियाने १८ आणि अभय शिंदेने १३ धावा केल्या, बाकी फलंदाजांना काही जमले नाही. साई सत्यमच्या अतिक सहायने ९ धावांत ३ बळी घेतले, मोहित चोरडियानेही १६ धावांत ३ गडी टिपले, तर रूपेन गायकवाड आणि विजय पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. पवन आनंदला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

दुसऱ्या सामन्यात ईगल्स क्रिकेट क्लबने मायटी स्टार्सचा अवघ्या ४ धावांनी थरारक पराभव केला. आधी खेळताना ईगल्स क्लबचा डाव १४.२ षटकांत ८६ धावांवर संपला. पुलकितने २०, सुनील झूतशीने १७ आणि दिव्यांशु पाठकने १४ धावा जोडल्या. मायटी स्टार्सच्या सचिन नायरने १७ धावांत ३ बळी घेतले, महेश कोकराळेने २ तर लहू लोहारने १ फलंदाज बाद केला. ८७ धावांचे सोपे वाटणारे लक्ष्य पाठलाग करताना मायटी स्टार्सचा संघ १९ षटकांत ८२ धावांत सर्वबाद झाला. संदीप ताऊरने नाबाद २४, वैभव जठारने २२ आणि लहू लोहारने १५ धावा करत विजयाचा प्रयत्न केला, पण ईगल्सच्या अंकित सिंगने ७ धावांत ३ बळी घेत सामना फिरवला. आकाश सिंगनेही १४ धावांत ३ गडी बाद करत विजयात मोलाचा वाटा उचलला. अंकित सिंग सामनावीर ठरला.

तिसऱ्या लढतीत विशाल गायकवाडच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पुणेरी क्रिकेट क्लबने कॉर्पोरेट क्रशर्स संघाला १५ धावांनी नमवले. आधी फलंदाजी करताना पुणेरी क्रिकेट क्लबचा डाव १९.४ षटकांत ११८ धावांत आटोपला. विशाल गायकवाडने २४, रजत आध्येने २२, महेश चव्हाणने १२ आणि आदेश उपाध्यायने ११ धावा केल्या. कॉर्पोरेट क्रशर्सच्या आनंद के. याने ३७ धावांत ५ बळी घेतले, तर राहुल रांगनेकरने २५ धावांत ३ गडी बाद केले. ११९ धावांचा पाठलाग करताना कॉर्पोरेट क्रशर्सचा संघ १७.४ षटकांत १०३ धावांवर गारद झाला. गोपाळ अगरवालने १६, प्रजेशने १४, कुलवीर सिंगने ११ आणि वैभव गडकरीने ११ धावा केल्या, पण संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. पुणेरी क्रिकेट क्लबच्या प्रसाद देवकातेने २३ धावांत ४ बळी घेतले, तर विशाल गायकवाडने १४ धावांत ३ गडी टिपले. अष्टपैलू खेळीबद्दल विशाल गायकवाडला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ