दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

वैजापुरात सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २१ वर्षांच्या शुभांगीची गळफासाने आत्महत्या; हुंड्याच्या छळाचा आईचा

वैजापुरात सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २१ वर्षांच्या शुभांगीची गळफासाने आत्महत्या; हुंड्याच्या छळाचा आईचा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात २१ वर्षांच्या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेतला. आईच्या फिर्यादीवरून विरगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून मन हेलावून टाकणारी आणि हुंडा प्रथेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. एका २१ वर्षांच्या नवविवाहितेने शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले. शुभांगी गौरव वाघचौरे असे या तरुणीचे नाव असून त्या गाढेपिंपळगाव येथे राहत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी यांचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वी गाढेपिंपळगाव येथील गौरव संजय वाघचौरे यांच्याशी झाले होते. नव्या संसाराची सुंदर स्वप्ने डोळ्यांत घेऊन त्यांनी सासरी पाऊल ठेवले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच हुंड्यावरून त्यांचा छळ सुरू झाला, असा गंभीर आरोप त्यांच्या आईने केला आहे.

आईच्या आरोपानुसार, हुंड्यातील उरलेले ५० हजार रुपये माहेरून घेऊन यावेत, यासाठी पती आणि सासरची इतर मंडळी शुभांगी यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होती. या सततच्या त्रासाला कंटाळून शुभांगी यांनी शनिवारी टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेतला.

या घटनेनंतर शुभांगी यांची आई नीता रवळे यांनी विरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती गौरव संजय वाघचौरे, सासरे संजय लक्ष्मण वाघचौरे, विमल संजय वाघचौरे, नवनाथ संजय वाघचौरे आणि शीतल नवनाथ वाघचौरे अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आणि इतर विविध कलमांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हुंड्याच्या जाचातून एका तरुण मुलीचा जीव गेल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ