शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

छत्रपती संभाजीनगरमध्ये ३४ इलेक्ट्रिक बस धावणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी विकासकामांचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगरमध्ये ३४ इलेक्ट्रिक बस धावणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी विकासकामांचे लोकार्पण छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. १) छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे.

लोकार्पण होणाऱ्या कामांमध्ये विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक आणि फुटबॉल मैदानाचा समावेश आहे. हे दोन्ही १० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेच्या ३४ इलेक्ट्रिक बस, ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि सिद्धार्थ उद्यानातील १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प यांचेही लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.

विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक आणि फुटबॉल मैदान उभारण्यात आले आहे. या सुविधा रविवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खुल्या केल्या जाणार आहेत.

महापालिकेच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या ३४ इलेक्ट्रिक बसचे उद्घाटनही त्याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या बसमुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळावी, यासाठी शहरात ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. यातील एक स्टेशन कॅनॉट गार्डनच्या गेट क्रमांक तीनजवळ आहे. दुसरे स्टेशन महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंपाजवळ, पुलाखाली उभारण्यात आले आहे. या चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

सिद्धार्थ उद्यानात उभारण्यात आलेल्या १०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पणही या दौऱ्यात केले जाणार आहे. याशिवाय या दौऱ्यात महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत विभागीय क्रीडा संकुलातील कार्यक्रम संपल्यानंतर सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना महापालिकेच्या ३४ इलेक्ट्रिक बसमधून जाबिंदा लॉन्स येथे नेले जाणार आहे. तेथे सुरू असलेले 'प्रौढ प्रताप पुरंदर' हे ऐतिहासिक महानाट्य विद्यार्थ्यांना दाखवले जाणार आहे. नव्याने दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करून हे महानाट्य पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ