मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:46 IST

चंद्रपुरात रिपाइंचा संघटन वर्धापनदिन उत्साहात, तुकूमच्या बुद्ध विहारात कार्यक्रम

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चंद्रपूर जिल्हा शाखेने ३ ऑक्टोबर २०२६ ला तुकूम येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात संघटन वर्धापनदिन साजरा केला.

चंद्रपुरात रिपाइंचा संघटन वर्धापनदिन उत्साहात, तुकूमच्या बुद्ध विहारात कार्यक्रम
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने ३ ऑक्टोबर २०२६ ला रिपब्लिकन संघटन वर्धापनदिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम तुकूम, चंद्रपूर येथे एसटी वर्कशॉपजवळच्या सिद्धार्थ बुद्ध विहारात उत्साहात पार पडला.

सभेचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेश चिटणिस गोपाल रायपुरे यांनी भूषवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

रिपब्लिकन पार्टीत कार्यकर्त्यांमध्ये आलेली उदासीनता झटकून एकसंघ संघटनशक्ती उभी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोपाळ रायपूरे यांनी केले.

माजी जिल्हाध्यक्ष तथा नागपूर प्रदेश उपाध्यक्ष यांनी रिपब्लिकन पार्टीच्या स्थापना दिवसाचे महत्त्व सांगितले. रिपाइंचे महाराष्ट्र राज्य चिटणिस अशोककुमार उमरे यांनी सांगितले की, एकसंघ संघटनशक्ती उभी करायची असेल तर सुरुवातीपासून पक्षाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या समता सैनिक दलाला सोबत घेऊन संघटनशक्ती वाढवणे गरजेचे आहे.

रिपाइं चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण यांनी आपले विचार सतत प्रचारात आणि प्रसारात ठेवावेत, असे सांगितले. प्रत्येक तालुक्यात मिटिंग घेऊन पक्षाचे काम सतत सुरू ठेवण्याबाबत त्यांनी विचार मांडले. जिल्हा उपाध्यक्ष कोमल रामटेके यांनी जिल्ह्यात नवी ऊर्जा आणण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीत व्यापक बदल करण्यावर भर दिला.

उमेश गौतम (युपी), गडचांदूर यांनी "हम बाबासाहब के अनुयायी है। हमे रिपाइं का कार्य अच्छा लगा। हम बाबाहसाहब के मुल संगठन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को आगे बढ़ाने के लिए सदोदित सहकार्य करते रहेंगे," असे म्हटले. नवयुवकांना जोडून कामाला लावावे, असेही त्यांनी सुचवले. हरदोना खुर्द येथील दिनेश गायकवाड यांनी सांगितले की रिपाइंचे काम करण्यात आपण कमी पडत आहोत, पण आमचे नेहमी सहकार्य राहील.

विहार समितीचे सचिव सतिश रामटेके म्हणाले की रिपब्लिकन ही एक विचारधारा आहे. डॉ. आंबेडकर म्हणाले होते की या देशातील लोक देश आणि रिपब्लिकन ही संकल्पना धोक्यात आणतील, असे त्यांनी सांगितले. जनतेने रिपाइंची आईसारखी जपणूक करावी, सदस्यांकडून मासिक फंड जमा करून पक्षाचे काम इतर जनतेसाठी करावे, पेड वर्कर तयार करावेत, पक्षात अंतर्गत सुधारणा कराव्यात, जनतेतील गैरसमज दूर करावेत आणि रिपब्लिकन पार्टीच्या संविधानानुसार काम करावे, असे मुद्दे त्यांनी मांडले.

पक्षातर्फे वरचेवर कार्यक्रम आणि बैठका होत राहाव्यात, इतर आंबेडकरी पक्षांशी संगनमत करून निवेदन द्यावे, विहारातील लोकांना पक्षाची माहिती द्यावी आणि इतर आंबेडकरी विचारांच्या पदाधिकाऱ्यांशी एकत्र येण्याबद्दल चर्चा करावी, या विषयांवरही उपस्थित कार्यकर्त्यांनी भर दिला.

१५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर स्टॉल लावण्यात येणार आहे. मंडप, लाईट, बॅनर, फुलहार वगैरेसाठी अंदाजे १०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असल्याने प्रत्येकाने ५०० रुपये किंवा प्रत्येक तालुक्यातून २,५०० रुपये द्यावेत, असे आवाहन करण्यात आले. दीक्षाभूमीवर पक्षाची ध्येये, उद्दिष्टे आणि धोरणे यांची पत्रके वाटून प्रचार करावा, राजकीय हितसंबंध जोपासावेत, समस्यांची निवेदने देऊन फॉलोअप घ्यावा, प्रसिद्धी माध्यम तयार करावे आणि पक्षाने सामाजिक समस्याही हाताळणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

गुरूदास रामटेके (कोषाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा), वाघमारे साहेब (उपाध्यक्ष, विहार समिती), मारोतराव रायपुरे (विहार अध्यक्ष), सतिश रामटेके, जनार्धन वाघमारे, दिनेश गायकवाड, उमेश गौतम, एस. बी. रायपूरे, पोर्णिमा अशोककुमार, दयाल वाळके गुरूजी, बी. एस. वाघमारे, देविदास दुर्गे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस प्रा. रविंद्रनाथ पाटील यांनी केले, तर पोर्णिमा अशोककुमार यांनी आभार मानले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ