मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

चंद्रपुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरच्या वतीने चोरखिडखी येथील ब्राईट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जिल्हास्तरीय एक दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले.

चंद्रपुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरच्या वतीने २७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय एक दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. चंद्रपूर येथील चोरखिडखी भागातील ब्राईट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये हे शिबीर झाले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात झाली. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नागपूर प्रदेश उपाध्यक्ष मा. बाजीरावजी उंदिरवाडे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.

उद्घाटनाच्या वेळी प्रशिक्षक आणि नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस प्रा. रविंद्रनाथ पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष गुरूदास रामटेके, संतोषभाई रामटेके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, जिल्हा संघटक रमेश पाटील (गडचांदूर) आणि बल्लारपूर तालुका अध्यक्ष अजय चव्हाण यांनीही शिबिरात भाग घेतला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये जि. एस. कांबळे गुरूजी, मुकेश मेश्राम, जनार्दन वाघमारे, जिवन डांगे, देविदास दुर्गे, राजेंद्र भगत, मारोतराव रायपूरे, सुरेश फुलझेले, हंसराज ताकसांडे (उपरवाही), अश्विन दुबे, संतोष धोटे आणि अजय पाटील यांचा सहभाग होता.

समारोपाच्या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे यांनी समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणावर भर दिला. बाबासाहेबांच्या काळापासून राजकीय पक्षांच्या आघाडीची फौज म्हणून हे दल ओळखले जाते, असे सांगून रिपब्लिकन कार्यकर्त्यांसोबत दलाच्या सैनिकांनाही प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असे उमरे म्हणाले. त्यासाठी दलाच्या प्रशिक्षणालाही वेळ द्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

माजी जिल्हाध्यक्ष आणि नागपूर प्रदेश उपाध्यक्ष बाजीरावजी उंदिरवाडे यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्षाला गती देण्यासाठी आणि उदासीनता दूर करण्यासाठी अशा प्रकारची शिबिरे आवश्यक आहेत.

कार्यशाळेचे प्रशिक्षक आणि नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन यांनी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत, म्हणजे तब्बल सहा तास, प्रशिक्षणार्थींना खेळीमेळीच्या वातावरणात गुंतवून ठेवले आणि उपयुक्त प्रशिक्षण दिले.

हे शिबीर भरवण्यासाठी जिल्हा सरचिटणीस प्रा. रविंद्रनाथ पाटील यांनी बरीच धावपळ केली आणि त्यांच्या या धावपळीला यश आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनही प्रा. रविंद्रनाथ पाटील यांनीच केले.

प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत अशी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत आणि रिपब्लिकन चळवळ गतिमान करावी, असा सूर शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांचा होता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ