मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:21 IST

ब्रम्हपुरीत गरबा-दांडिया स्पर्धा; महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ, शिवानी वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

ब्रम्हपुरी येथे विजयकिरण फाउंडेशनतर्फे आयोजित गरबा-दांडिया स्पर्धेच्या उद्घाटनात शिवानी वडेट्टीवार यांनी महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याची गरज मांडली.

ब्रम्हपुरीत गरबा-दांडिया स्पर्धा; महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ, शिवानी वडेट्टीवार यांचे प्रतिपादन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ब्रम्हपुरी येथे गरबा-दांडिया स्पर्धा घेण्यात आली. विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि विजयकिरण फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार बोलत होत्या.

गरबा-दांडिया हा फक्त नृत्याचा उत्सव नाही, असे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीचे जतन करणारा आणि महिला व युवतींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देणारा हा उपक्रम आहे, असे त्या म्हणाल्या. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, तसेच एकोपा आणि उत्साहाचे वातावरण तयार होते, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

शिवानी वडेट्टीवार पुढे म्हणाल्या की, आजच्या महिला आणि युवती प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज आहे. विजयभाऊ वडेट्टीवार आणि विजयकिरण फाउंडेशन यांच्या पुढाकारातून झालेली ही स्पर्धा महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारी आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःमधील कला सादर करण्याची संधी मिळते आणि सांस्कृतिक परंपरांशी असलेली नाळ अधिक घट्ट होते.

यावेळी मंचावर महीला काॅंग्रेस अध्यक्षा योगिता आमले, कृउबा उपसभापती सुनीता तिडके, माजी नगरसेविका लता ठाकूर, न.प.सभापती बबीता आमले, माजी नगरसेविका वनिता अलगदेवे, नगरसेविका रेणू ठेंगरी, नगरसेविका जयश्री कुथे, नगरसेविका रंजना बुराडे, नगरसेविका ज्योती राऊत, नगरसेविका पुष्पलता पोपटे, नगरसेविका गीता मेश्राम आणि नगरसेविका हेमलता सिंहगडे उपस्थित होत्या. शहर कार्याध्यक्ष सुधा राऊत, सोशल मीडिया प्रमुख रश्मी पगाडे, महीला काॅंग्रेस सचिव सुशीला सोंडवले, सुष्मा नागमोती, सुनीता पंचवटे आणि कल्पना तुपट यांचीही उपस्थिती होती.

स्पर्धेचा निकाल असा लागला. ३१ हजार रुपयांचा प्रथम क्रमांक जेन बीट गरबा स्टुडीओ, ब्रम्हपुरी यांनी पटकावला. २१ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांक सखी मंच गरबा गृप, ब्रम्हपुरी यांना मिळाला. तृतीय क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस गोपी बीट गरबा गृप, ब्रम्हपुरी यांनी जिंकले.

कार्यक्रमात प्रशिक्षक आशिष मुळे, प्रांजली मुंगले, अल्का खोकले, साधना केळझरकर आणि संगिता राऊत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद व एजाज खान यांनी केले. सुधीर पंदीलवार यांनी आभार मानले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ