शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बद्रीनाथहून निघालेल्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला, सहा जणांच्या मृत्यूची माहिती

बद्रीनाथहून निघालेल्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला, सहा जणांच्या मृत्यूची माहिती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यान हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. चाई गावाजवळ शेवटचे लोकेशन मिळाले होते; शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून चिंता वाढवणारी बातमी आली आहे. बद्रीनाथ धामहून निघालेले एक हेलिकॉप्टर बद्रीनाथ आणि जोशीमठ यांच्यादरम्यान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला आणि त्याचे लोकेशन मिळत नव्हते, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी राज्य सरकारच्या हेलीपॅडवरून ट्रान्स भारत कंपनीच्या 'HCX' हेलिकॉप्टरने बद्रीनाथ धामहून उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर देहरादूनमधील सहस्रधाराकडे जात होते. उड्डाणानंतर अवघ्या १५ मिनिटांत त्याचा एटीसी (ATC) आणि आरटी (RT) संपर्क तुटला. त्यानंतर संपर्क साधण्याचे प्रयत्न सतत सुरू होते, पण हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागला नव्हता.

हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण सहा जण होते. पायलट हिमांशू यांच्यासह प्रथापा, अरुण साळुंके, शंकरगौडा व्ही. जी., सुधीर के. आणि एच. एस. नागराजा हे प्रवासी त्यात होते.

हेलिकॉप्टर डोंगरावरील कड्यावर आदळून कोसळले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जोशीमठमधील चाई गावाजवळ त्याचे शेवटचे लोकेशन मिळाले होते. त्यानंतर एसडीएमसह बचाव आणि मदत पथक घटनास्थळी रवाना झाले. एसडीआरएफचे पथक डोंगरावर चढून शोध घेत आहे. बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यानचा हा भाग डोंगराळ असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदकिशोर जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या जंगलात पांढऱ्या रंगाच्या एखाद्या वस्तूला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ती खरी आहे का, हे तपासण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणखी एक हेलिकॉप्टर हवाई पाहणीसाठी पाठवण्यात आले आहे. बेपत्ता हेलिकॉप्टरच्या शोधासाठी दोन अन्य हेलिकॉप्टरची मदत घेतली जात असून ती संबंधित परिसरात शोध घेत आहेत.

संपर्क नेमका कोणत्या ठिकाणी तुटला, हेलिकॉप्टरमध्ये किती प्रवासी होते आणि शेवटचे लोकेशन काय होते, याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक करत आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. जोशीमठजवळील चाई गावात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने बचावकार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपण संपूर्ण घटनाक्रमावर सतत लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गंभीर जखमी असतील तर त्यांना तातडीने एअरलिफ्ट करून पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असावेत, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ