मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:27 IST

उरलेल्या भातापासून १० मिनिटांत बनवा टेस्टी मंचुरियन, नाश्त्यासाठी झटपट रेसिपी

रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणातला उरलेला भात फेकून न देता त्यापासून घरीच टेस्टी आणि हेल्दी मंचुरियन बनवता येतात. शेजवान चटणीसोबत त्यांची चव अतिशय सुंदर लागते.

उरलेल्या भातापासून १० मिनिटांत बनवा टेस्टी मंचुरियन, नाश्त्यासाठी झटपट रेसिपी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर घरात बऱ्याचदा भात उरतोच. असा उरलेला भात एकतर फ्रिजमध्ये ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यापासून फोडणीचा भात किंवा दुसरे काही पदार्थ बनवले जातात.

पण नेहमीच उरलेल्या भाताचा फोडणीचा भात किंवा मसाले भात खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी नवीन खाण्याची खूप इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट मंचुरियन बनवू शकता. चायनीज सगळ्यांनाच खूप आवडतं आणि ते पाहिलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.

म्हणून बाहेरून विकतचे मंचुरियन आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी मंचुरियन खावेत. शेजवान चटणीसोबत मंचुरियनची चव अतिशय सुंदर लागते. घरातलं उरलेलं जेवण फेकून देण्याऐवजी त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खावेत. चला तर मग, मंचुरियन बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य आधी बघून घ्या. उरलेला भात, गाजर, कोबी, शिमला मिरची, कॉर्नफ्लॉवर, मैदा, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, सोया सॉस, मीठ, रेड चिली सॉस आणि काळीमिरी पावडर इतकं साहित्य लागतं.

सर्वात आधी भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या आणि किसणीच्या मदतीने बारीक किसा. कोबीमधलं पाणी पूर्णपणे गाळून काढून टाका, म्हणजे मिश्रण पातळ होत नाही.

आता एका मोठ्या वाटीत हाताने कुसकरून घेतलेला भात घ्या. त्यात किसलेले गाजर, शिमला मिरची, कोबी आणि बारीक चिरलेला कांदा घालून सगळं हाताने व्यवस्थित एकत्र करा.

तयार झालेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, लाल तिखट, काळीमिरी पावडर, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस आणि रेड चिली सॉस घाला आणि पुन्हा हाताने नीट मिसळा.

त्यानंतर मिश्रणात मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून सगळं व्यवस्थित एकजीव करा. मग मिश्रण काहीवेळ तसंच ठेवून द्या.

आता कढईत तेल गरम करा. त्या गरम तेलात मंचुरियन सोडा आणि दोन्ही बाजूंनी मंद आचेवर तळून घ्या. मंचुरियन तळताना गॅस जास्त फास्ट ठेवू नये.

झाले, उरलेल्या भाताचे टेस्टी मंचुरियन तयार आहेत. शेजवान चटणीसोबत गरमागरम खा आणि नाश्त्याला नवा पदार्थ मिळाल्याचा आनंद घ्या.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ