कुर्ता-धोतरात लॅम्बोर्गिनीत बसले अशोक सराफ; व्हिडिओवर स्वप्नील जोशींची कमेंट चर्चेत
अशोक सराफ भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीत बसताना दिसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो एआय जनरेटेड असल्याची चर्चा आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वाचे चाहते फक्त सर्वसामान्य प्रेक्षकच नाहीत, तर मनोरंजनविश्वातील कलाकारही आहेत. सध्या अशोक सराफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातील त्यांच्या हटके अंदाजाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अशोक सराफ हे नेहमी त्यांच्या साधेपणामुळे ओळखले जातात. त्यांनी कधीही कोणताही बडेजाव केलेला नाही. मात्र आता त्यांचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये अशोक सराफ थेट लॅम्बोर्गिनी गाडीत येऊन बसताना आणि नंतर तिथून निघून जाताना दिसतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी एवढी महागडी गाडी कधी घेतली, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत अशोक सराफ एका बिल्डिंगमधून बाहेर येताना दिसतात. त्यांनी राखाडी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे धोतर नेसले आहे. चालत येऊन ते भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीत बसतात. गाडीत बसण्यापूर्वी ते पायातील भगव्या रंगाचे फ्लिपफ्लॉप काढून बाजूला ठेवतात. अशोक सराफ यांचा हा स्वॅग पाहून सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे जात आहे.
या व्हिडिओवर सध्या नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अशोक सराफ यांचा हा व्हिडिओ खरा आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे. हा व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याची चर्चा सुरू असून, नेटकऱ्यांनी त्यातील एक चूकही शोधून काढली आहे.
अशोक सराफ यांचा हा व्हिडिओ पाहून अभिनेता स्वप्नील जोशी यांनीही त्यावर कमेंट केली आहे. त्यांनी केलेल्या त्या कमेंटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, ती कमेंट सध्या चर्चेत आहे.
एकूणच, कुर्ता-धोतरातील साधा पोशाख आणि महागडी लॅम्बोर्गिनी हा विरोधाभास या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील या ज्येष्ठ अभिनेत्याचा हटके अंदाज पाहून चाहते आणि नेटकरी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची आणि त्यावरील कमेंट्सची चर्चा सुरू आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.