मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:26 IST

'आदि अनंत' चित्रपटाचे पोस्टर जेजुरीत प्रकाशित; अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे झळकणार

नात्यांतील प्रेम आणि आपलेपणाची गोष्ट हसत-खेळत सांगणारा 'आदि अनंत' १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'आदि अनंत' चित्रपटाचे पोस्टर जेजुरीत प्रकाशित; अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे झळकणार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

'आदि अनंत' या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे. नात्यांमधील प्रेम, आपलेपणा, सहवास आणि भावनांची गोष्ट हसत-खेळत मांडणारा हा चित्रपट आहे. जेजुरी येथे श्री खंडोबाचा आशीर्वाद घेऊन या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोस्टरवर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते दिसते. एकाच्या कुशीत दुसरा विसावलेला आहे, हे दृश्य त्यांच्यातला विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधार यांची जाणीव करून देते. त्यामुळे 'आदि अनंत' नेमक्या कोणत्या नात्याची गोष्ट सांगणार, याची उत्सुकता वाढली आहे. सराफ आणि कऱ्हाडे यांची जोडी असल्याने चित्रपटात धमाल आणि विनोदाची मेजवानीही मिळणार, असे संकेत पोस्टरवरून मिळतात.

या दोघांसोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणसं जवळ असूनही त्यांच्यातले भावनिक अंतर वाढताना दिसते. अशा वेळी आपल्या माणसांचा सहवास, प्रेम आणि आपलेपणा किती महत्त्वाचा असतो, याभोवती 'आदि अनंत'ची कथा गुंफलेली असल्याचे पोस्टरवरून जाणवते. कुटुंबातील नात्यांची ऊब आणि त्यातून तयार होणाऱ्या आठवणी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असतील.

चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये म्हणाले, "नात्यांमध्ये अनेकदा न बोलताही खूप काही सांगितलं जातं. एखाद्या नात्याची किंमत त्यातल्या मोठ्या प्रसंगांपेक्षा छोट्या-छोट्या क्षणांत जाणवते. 'आदि अनंत' करताना मला याच भावविश्वाला पडद्यावर मोकळेपणाने जगवायचं होतं. प्रत्येक पात्राच्या भावनांशी प्रेक्षकांनी कुठेतरी स्वतःला जोडावं, हा या चित्रपटामागचा माझा प्रयत्न आहे."

निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे यांनी सांगितले, "'आदि अनंत' ही प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे. हा सिनेमा पाहिल्यावर प्रत्येकाला आपल्या घरातल्या, आपल्या माणसांची आठवण येईल, याची आम्हाला खात्री आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल."

पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत करत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह हे सहनिर्माते आहेत. महेश लिमये यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत.

'आदि अनंत' येत्या १२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ