बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:00 IST

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी सहाव्या दिवशी २० उमेदवारांचे २९ अर्ज, एकूण उमेदवार ३१

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी २० उमेदवारांनी २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आतापर्यंत एकूण ३१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी सहाव्या दिवशी २० उमेदवारांचे २९ अर्ज, एकूण उमेदवार ३१ छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा मंगळवारी सहावा आणि शेवटचा दिवस होता. या दिवशी २० उमेदवारांनी मिळून २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्याच दिवशी २ व्यक्तींनी ६ नामनिर्देशनपत्रे उचलली आहेत. आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या आता ३१ झाली आहे.

मंगळवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये सुमित सुरेशराव पवार (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (शिवसेना अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (भाजपा २ अपक्ष), विनोद प्रल्हाद कडू (अपक्ष) आणि दिलीप भिमराव कडू (अपक्ष) यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर सजील खान खलील खान (अपक्ष), श्रीकृष्ण सुर्यभान पहुरकर (अपक्ष), अदिती ऋषिकेश पोहरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- ३) आणि भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव (भाजपा+अपक्ष) यांनीही अर्ज दाखल केले.

याशिवाय प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष ३), प्रीती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), मिलिंद तुकाराम ब्राह्मणे (अपक्ष) आणि किरण अर्जुन चौधरी (अपक्ष) यांची नावे यादीत आहेत. हेमलता दिलीपसिंग मुनौत (अपक्ष), किरण अर्जुन पवार (अपक्ष), राजेशकुमार शालिग्राम कड (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी) आणि रामदास संपतराव कटक (अपक्ष) यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने कळवले आहे की, उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्याकडे, विभागीय आयुक्त कार्यालयात, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल.

काँग्रेसच्या उमेदवार अदिती ऋषिकेश पोहरे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी खासदार बलवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अॅड. यशोमती ठाकूर, हर्षवर्धन देशमुख, आमदार साजिद पठाण, पदवीधर आमदार धीरज लिंगाडे आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप हजर होते. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, दिलीप एडतकर, महिला अध्यक्ष जयश्री वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष नजीर खान बीके, अंजली ठाकरे, गणेश रॉय आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अॅड. प्रीती हर्षल रेवणे यांनीही अर्ज भरला. पक्षाचे वरिष्ठ मार्गदर्शक सुनील राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला. त्यावेळी समर्थकांनी घोषणाबाजी केली. रेवणे या सध्या नगरसेविका असून महापालिकेच्या शिक्षण सभापती म्हणूनही काम पाहतात. आमदार राणा यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळेल, अशी चर्चा आहे.

रेवणे यांच्या अर्जाच्या वेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, उपमहापौर सचिन भेंडे, नगराध्यक्षा योगिता कोलटके आणि नितीन काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ