मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:01 IST

गाडीवर आमदाराचा बनावट लोगो लावून फिरणं पडलं महागात, पोलिसांनी कार जप्त करून मालकावर गुन्हा दाखल केला

पुण्यातील वारजे माळवाडी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी एका कार मालकाचा प्रताप उघडकीस आणला असून, घरात कोणीही आमदार नसताना गाडीवर आमदार असल्याचा बनाव रचल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडीवर आमदाराचा बनावट लोगो लावून फिरणं पडलं महागात, पोलिसांनी कार जप्त करून मालकावर गुन्हा दाखल केला
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पुण्यात एका कार मालकाने स्वतःच्या घरात कोणीही आमदार नसताना आपल्या गाडीवर आमदार असल्याचा बनाव रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. वारजे माळवाडी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी हा प्रकार पकडला असून संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यात कार मालकाचे नाव दिग्वीजय दिपक मोरे (वय ३३, रा. नऱ्हे) असे आहे. ही कारवाई २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

वारजे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण जाधव आणि त्यांचे पथक कर्वे ब्रिज परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका शोरूमसमोर काळ्या रंगाची कार वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभी असलेली दिसली. या गाडीवर 'एमएच.१२.एस.एफ.१२' असा फॅन्सी नंबर होता. शिवाय गाडीच्या पुढच्या काचेच्या डाव्या बाजूला 'विधानसभा सदस्य, आमदार' असा लोगोही चिकटवलेला होता, ज्यामुळे पोलिसांचे लक्ष या गाडीकडे गेले. पोलिसांनी ई-चालान मशीनच्या मदतीने वाहन मालकाचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोनवर संपर्क साधलेल्या व्यक्तीने ही गाडी आपली नसल्याचे सांगितले, त्यामुळे पोलिसांनी काही वेळ थांबून पाहिले. अखेर बराच वेळ प्रतीक्षा करूनही कोणी पुढे न आल्याने क्रेनच्या साहाय्याने ही गाडी वारजे वाहतूक विभागात आणून जमा करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी पोलिसांनी वाहन मालकाची अधिक चौकशी केली, तेव्हा तो स्वतः किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही आमदार नसल्याचे स्पष्ट झाले. आपण आमदार असल्याचा आभास निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्याने हा लोगो वापरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. यावरून सरकारतर्फे तक्रार देण्यात आली असून बीएनएस कलम २०५ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे.

दुसऱ्या एका घटनेत, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या एका तोतयाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २३ सप्टेंबरला सकाळी साधारण अकराच्या सुमारास बालेवाडीतील लक्ष्मीनगर भागात उघडकीस आली. अटक करण्यात आलेल्याचे नाव वैभव संतोष भोंग (वय २५, रा. पिसेवाडी, माळशिरस, सोलापूर) असे आहे. या प्रकरणी पोलीस अमलदार मनोज देशमुख यांनी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ