बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पायल झांबरे प्रकरणात पतीनंतर सासू-सासरेही पोलिसांच्या ताब्यात, मुकुंदनगरमधील घटनेत स्वारगेट पोलिसांची कारवाई

पायल झांबरे प्रकरणात पतीनंतर सासू-सासरेही पोलिसांच्या ताब्यात, मुकुंदनगरमधील घटनेत स्वारगेट पोलिसांची कारवाई छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात फरार असलेले सासरे अरविंद आणि सासू मंगल झांबरे यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. पतीला यापूर्वीच अटक झाली आहे.

पुण्यातील मुकुंदनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पायल झांबरे यांच्या मृत्यू प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेले पायल यांचे सासरे अरविंद झांबरे आणि सासू मंगल झांबरे यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पतीला यापूर्वीच अटक झाली होती, त्यामुळे आता तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. सासू-सासरे हाती लागल्यामुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पायल यांचा पती अक्षय झांबरे याला अटक केली होती. तो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेले सासू-सासरे पोलिसांना गुंगारा देत होते. पण स्वारगेट पोलिसांनी तपास वेगाने पुढे नेला आणि दोघांनाही आपल्या ताब्यात घेतले.

आता नेमके प्रकरण काय, ते पाहू. १ नोव्हेंबर रोजी २९ वर्षांच्या विवाहित पायल झांबरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले. हुंडाबळी आणि सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. मृत्यूपूर्वी पायल यांनी आपल्या भावाला "माझी सासू या सगळ्याला जबाबदार आहे" असा स्पष्ट मेसेज पाठवला होता.

या घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पायल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नात माहेरच्या मंडळींनी तब्बल ७० ते ८० लाख रुपये खर्च केले होते. तरीही सासरच्या लोकांचे समाधान झाले नव्हते, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. लग्नानंतर पायल यांच्याकडे वारंवार सोने आणि पैशांची मागणी केली जात होती, असेही कुटुंबीय सांगतात. विशेषतः दिवाळीच्या सणात माहेरून १० तोळे सोने आणण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला जात होता, असा त्यांचा आरोप आहे. या त्रासाला आणि सततच्या टॉर्चरला कंटाळून पायल यांनी टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पती, सासू आणि सासरे आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने या प्रकरणाचा आणखी सखोल तपास केला जात आहे.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ