शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

मनिषा इंगळे, सनी कांबळे यांचं 'फुलपाखरू' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रीकरण पुण्यात

मनिषा इंगळे, सनी कांबळे यांचं 'फुलपाखरू' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रीकरण पुण्यात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

चिमुकल्या परीच्या स्वप्नवत विश्वाची सफर घडवणारं 'फुलपाखरू' हे नवं मराठी गाणं प्रदर्शित झालं आहे. मनिषा इंगळे यांनी यात पहिल्यांदाच आईची भूमिका केली आहे.

'फुलपाखरू' हे नवं मराठी गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बालपणातली निरागसता, कल्पनाशक्ती, स्वप्नं आणि आनंद यांनी बहरलेल्या विश्वात हे गाणं घेऊन जातं.

सोशल मीडिया क्वीन आणि अभिनेत्री मनिषा इंगळे, अभिनेता सनी कांबळे आणि बालकलाकार रिधिमा निचित हे तिघं या गाण्यात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.

टाइमलेस स्लेट्स प्रस्तुत आणि टाइमलेस स्लेट्स प्रॉडक्शन्स निर्मित या गाण्यात एका चिमुकल्या परीचं रंगीबेरंगी, स्वप्नवत आणि कल्पनारम्य विश्व उलगडलं आहे. रंगीबेरंगी फुलपाखरं, परीचं रूप, आकर्षक दृश्यरचना आणि कुटुंबातील प्रेमळ क्षण यांची सुंदर सांगड गाण्यात पाहायला मिळते. गाण्याच्या पोस्टरनेही आधीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

'फुलपाखरू' गाण्याचं चित्रीकरण पुण्यातील विविध ठिकाणी झालं आहे. गाण्याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सनी कांबळे यांचं आहे. निर्मितीची जबाबदारी सनी कांबळे आणि तेजस पानसरे यांनी सांभाळली.

संगीताची बाजू प्रज्वल यादव आणि विवेकानंद सणप यांनी सांभाळली आहे. हे गाणं नव्या सणप आणि ऋषभ साठे यांनी गायलं आहे, तर गीतलेखन विवेकानंद सणप यांचं आहे.

पडद्यामागे अनेकांनी काम केलं आहे. असिस्टंट डायरेक्टर म्हणून रोहन वाते आणि कुमार गायकवाड यांनी काम पाहिलं. एडिटिंग विनय शिंदे यांचं, डीआय मयूर सातपुते यांचं आणि व्हीएफएक्स असारफ शेख यांचं आहे. आर्ट डायरेक्शन सनी कांबळे आणि नितीश कुमार यांनी सांभाळलं आहे.

प्रसिद्धी डिझाइनची जबाबदारी अनिकेत महाडिक यांच्याकडे होती, तर पीआर विनया सावंत (फॉरेवर पीआर) यांनी पाहिला. गाण्याच्या बीटीएससाठी रवी शिंदे, प्रिया आणि रुद्र यांनी काम केलं आहे.

चित्रीकरणाबद्दल बोलताना अभिनेत्री मनिषा इंगळे सांगते, "मला गाण्याची ऑफर आली तेव्हा मी लगेचच हो म्हटलं होतं. मी पहिल्यांदाच एका आईच्या भूमिकेत काम केलं आहे. याआधी मी अनेक रोमँटिक आणि ट्रेंडिंग गाण्यांमध्ये काम केलं आहे."

पुणे शहरात आणि जवळच्या गावांमध्ये झालेल्या चित्रीकरणाचा अनुभवही तिने सांगितला. प्रॉडक्शनकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे शूटिंग करताना खूप मजा आली. गाण्यातील दृश्यांसाठी उभारलेले सेटअपही खूप सुंदर होते, असं मनिषाने सांगितलं.

बालपणातली निरागसता, कुटुंबातलं प्रेम आणि कल्पनाविश्वातले रम्य क्षण अनुभवायला देणारं 'फुलपाखरू' हे गाणं लहान मुलांसोबत मोठ्यांनाही नक्कीच आवडेल, अशी आशा मनिषा इंगळे यांनी व्यक्त केली आहे.

#पुणे#कल्चर#PT24#Culture#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ