मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:23 IST

यावल शहराच्या ५६.०३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे सुमारे निम्मे काम पूर्ण

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातील योजनेवर आतापर्यंत साडेसात कोटी रुपये खर्च झाले असून फेब्रुवारी-मार्चमध्ये शहराला पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे.

यावल शहराच्या ५६.०३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे सुमारे निम्मे काम पूर्ण
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत यावल शहरासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ५६.०३ कोटी रुपयांच्या या योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

या योजनेला १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. कंत्राटदार मे. एससीआयपीएल व संदीप कन्स्ट्रक्शन, गंगाखेड यांना २३ मे २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला. योजनेची माहिती नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी दिली.

योजनेचा उद्भव तापी नदीकाठी, टाकरखेडा गावाजवळच्या शेळगाव बॅरेज येथे घेण्यात आला आहे. तिथे पाच मीटर व्यासाचा एक इंटेक वेल, दोन इन्स्पेक्शन वेल आणि आठ मीटर व्यासाची जॅकवेल उभारली जाणार आहे. शिवाय २०० मीटरचा अप्रोच बंड आणि ६०० मीटरचा अप्रोच रोडही केला जाणार आहे.

अप्रोच बंडचे काम पूर्ण झाले आहे, तर जॅकवेल आणि इंटेक वेलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नदीचे पाणी इंटेक वेलमधून जॅकवेलमध्ये नेण्यासाठी ६०० मि.मी. व्यासाची पाईपलाईन टाकली जात आहे. जॅकवेलमधले पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पाठवण्यासाठी २५० एचपीचा पंप बसवला जात आहे. विजेचा खर्च वाचावा म्हणून १९० केव्हीचा सोलर प्लांटही बसवण्यात येत आहे.

जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र ही ४०० मि.मी. व्यासाची पाईपलाईन ८ किमी लांबीची आहे. त्यापैकी ४.१० किमी काम झाले आहे. योजनेत ११ दशलक्ष लिटर क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, प्री-सेटलिंग टैंक, फिल्टर बेड साफ करण्याची यंत्रणा आणि पाण्याचा पुनर्वापर यांचा समावेश आहे. ६० एचपीने २२ लक्ष लिटरच्या साने गुरुजी जलकुंभात आणि ५० एचपीने १० लक्ष लिटरच्या श्रीराम नगर जलकुंभात पाणी चढवले जाईल. केंद्रावर १२० केव्हीचा सोलर प्लांटही आहे. केंद्राचे ४५ टक्के काम झाले असून ५७ किमी वितरण वाहिनीपैकी २१ किमी काम पूर्ण झाले आहे.

माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी सांगितले की, सन २०२१ मध्ये २०५६ ची लोकसंख्या गृहीत धरून दरडोई १३५ लिटर पाणी मिळाले पाहिजे, या भूमिकेतून हे स्वप्न पाहिले होते आणि ते आता पूर्ण होताना दिसत आहे. योजना ५६ कोटींची आहे, पण आतापर्यंत फक्त साडेसात कोटी रुपये मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. पूर्वी पारंपरिक फिल्टर होते आणि गाळ Manually काढावा लागत होता. आता नव्या केंद्रात Mechanisum पद्धतीने गाळ काढला जाणार आहे. पुढच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये या नव्या शेळगाव योजनेवरून शहराला पाणी देऊ शकू, अशी खात्री आहे, असे ते म्हणाले.

पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील म्हणाल्या, "सध्या प्रशासनाकडून योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत काम लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. थौडा रस्त्याची अडचण होती तर ती लवकरच प्रयत्न करून सोडविली जाईल."

नगराध्यक्षा छाया पाटील यांनी केलेल्या पाहणीच्या वेळी नगरसेवक अतुल पाटील, अभियंता अनुराधा पाटील, दादू धोत्रे, पीएमसीचे जैन, सुमित, नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक पराग सराफ, उमर कच्ची, करीम मन्यार, शिवसेना तालुकाप्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, योगेश पाटील, पप्पू जोशी, फारूक हाजी, नरेंद्र शिंदे, भूषण खैरे, किशोर माळी आणि पत्रकार उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ