बर्थडेला स्वतःलाच महागडं गिफ्ट, विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे इतकी
मराठी अभिनेता विकास पाटील याने स्वतःच्या वाढदिवशी नवी Vitara कार खरेदी करत स्वतःलाच खास भेट दिली, फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेता विकास पाटील सध्या त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्याने नवी Vitara कार घेतली आणि स्वतःलाच एक खास भेट दिली. आपल्या वाढदिवसाचा दिवस त्याने आणखी खास बनवत ही गाडी खरेदी केली आणि या आनंदाच्या क्षणाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांसोबतही शेअर केले.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये विकासचे कुटुंबीयही त्याच्यासोबत दिसत आहेत. नव्या कारसोबतचा हा खास क्षण त्याने चाहत्यांसमोर मांडला असून वाढदिवस आणि नवी कार अशा दुहेरी आनंदामुळे विकाससाठी हा दिवस विशेष ठरला. कुटुंबासोबतचे हे फोटो पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, Vitara या कारची किंमत साधारण १२ ते २३ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. फोटो शेअर होताच विकासच्या मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नव्या कारचे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्समधूनही त्याचं अभिनंदन केलं.
विकास पाटील गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनविश्वात काम करत आहे. 'तुकाराम' या चित्रपटातील त्याची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात त्याने संत तुकाराम महाराजांच्या धाकट्या भावाची, कान्होबाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे विकासला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि तो घराघरात ओळखला जाऊ लागला.
याशिवाय विकास पाटीलने 'बिग बॉस मराठी ३' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. या शोच्या पर्वात त्याने आपल्या खेळाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि टॉप ५ पर्यंत मजल मारली होती. या शोमुळे विकासला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आणि त्याचा चाहतावर्गही वाढला.
आता नव्या Vitara कारच्या निमित्ताने विकास पाटील पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाढदिवशी स्वतःलाच दिलेल्या या खास गिफ्टमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विकासने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, त्याच्या या आनंदाच्या क्षणात चाहतेही सहभागी झाले आहेत.