सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:54 IST

टायगर श्रॉफच्या भेटीनंतर राम पूर्णेकरांचा सवाल, शिंदेंच्या घरासमोर उपोषणाचा इशारा

प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी दसऱ्यानंतर साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.

टायगर श्रॉफच्या भेटीनंतर राम पूर्णेकरांचा सवाल, शिंदेंच्या घरासमोर उपोषणाचा इशारा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईसारख्या शहरात बॉलिवूड स्टार्सवर गोळीबार होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. याच दरम्यान राज्याच्या राजकारणात आणखी एका मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तातडीने भेट दिली. त्याचा संदर्भ देत ठाण्यातील ठाकरे गटाचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणात न्यायासाठी वारंवार पाठपुरावा केला, तरी ठोस कारवाई होत नाही, असा त्यांचा आरोप आहे.

राम पूर्णेकर यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्या घरापासून त्यांचे घर फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. टायगर श्रॉफच्या प्रकरणात लगेच हालचाली झाल्या. मग आमच्या कुटुंबाची विचारपूस करायला आणि न्यायाचे आश्वासन द्यायला कोणी पुढाकार का घेतला नाही, असा सवाल त्यांनी केला.

"माझे वडीलही शिवसैनिक होते. त्यांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबाच्या वेदना समजून घ्यायला कोणी आले नाही. आम्हाला सहानुभूतीचे शब्द नकोत, न्याय हवा आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूचा उल्लेख करत राम पूर्णेकर यांनी तपास आणि आरोपींची अटक याबद्दल प्रश्न उपस्थित केले. काही जणांविरोधात पुरावे आहेत, असा त्यांचा दावा आहे. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असेही त्यांनी विचारले आहे.

पप्या शिंदे आणि राजा शिंदे यांच्या चौकशीचा उल्लेख करून त्यांनी इतर संशयितांच्या बाबतीतही पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली. मात्र त्यांच्या आरोपांवर तपास यंत्रणांची अधिकृत भूमिका समोर येणे महत्त्वाचे आहे.

आता राम पूर्णेकर यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे. दसरा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर साखळी उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आरोपींना अटक होऊन कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

"माझ्या आईला विधवा केले. आमच्या कुटुंबाच्या भावनांचे काय?" असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. आता संबंधित यंत्रणा काय भूमिका घेणार, आरोपींच्या बाबतीत पुढे कोणती कारवाई होणार आणि राम पूर्णेकर यांच्या मागण्यांवर सरकारकडून काही प्रतिसाद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ