शुक्र-राहू युतीमुळे 36 दिवस वृषभ, कर्क, तुळ, कुंभ राशींना धनलाभाचे योग
वैदिक ज्योतिषानुसार शुक्र ग्रह राहूच्या स्वाती नक्षत्रात दाखल झाला असून पुढील 36 दिवस याच स्थितीत राहणार आहे, यामुळे चार राशींना आर्थिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या सततच्या बदलांचा माणसाच्या आयुष्यावर आणि राशींवर मोठा परिणाम होतो, असं वैदिक ज्योतिषशास्त्र सांगतं. संपत्ती, ऐश्वर्य आणि चैनीच्या आयुष्याचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह सध्या राहूच्या स्वाती नक्षत्रात विराजमान झाला आहे. शुक्र या नक्षत्रात दाखल झाला असून पुढील 36 दिवस तो याच स्थितीत राहणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार शुक्र आणि राहू यांच्या या संयोगामुळे चार भाग्यवान राशींच्या आर्थिक अडचणी दूर होऊन आयुष्यात सुखाचे दिवस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ज्योतिषांच्या मार्गदर्शनानुसार शुक्र हा पैसा आणि सुखसोयी देणारा ग्रह मानला जातो, तर स्वाती नक्षत्राचे स्वामी राहू आहेत. या दोन बलवान ग्रहांच्या प्रभावामुळे मेष ते मीन या सगळ्याच राशींवर काही ना काही परिणाम होणार आहे. पण वृषभ, कर्क, तुळ आणि कुंभ या चार राशींच्या लोकांसाठी हा काळ खूपच शुभ आणि फायद्याचा ठरणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत या काळात मोठी सुधारणा होईल, असं सांगितलं जातं. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना पार्टनरशिपमधल्या कामातून मोठा फायदा होईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं एखादं महत्त्वाचं काम मार्गी लागल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार असून अडकलेले पैसे परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जमीन किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहारातून चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल, त्यामुळे नातं आणखी घट्ट होईल. भौतिक सुखसोयींमध्ये मोठी वाढ होईल असं सांगितलं जातं.
तुळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास शुक्राच्या या गोचरामुळे दुप्पट होईल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नव्या आणि चांगल्या संधी येतील. आर्थिक बाजू आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. घरातल्या माणसांचं आणि जोडीदाराचं पूर्ण साथ मिळाल्यामुळे मन आनंदी राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अचानक पैसे मिळवून देणारा ठरू शकतो. बँक बॅलन्स वाढवण्याच्या अनेक चांगल्या संधी हाती येतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल आणि बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामं लवकर पूर्ण होतील. घरात आनंदाचं वातावरण दिसेल.
ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषीय अंदाजांवर आधारित आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच योग्य ठरतं. या माहितीला दुजोरा दिला जात नाही आणि ती पूर्णपणे खरी असल्याचा दावाही केला जात नाही.