मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

अमित शाह यांना गृहमंत्रिपदावरून हटवा, संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

अमित शाह यांना गृहमंत्रिपदावरून हटवा, संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

१३ कोटी मतदारांना बांगलादेशी म्हणत असाल तर एवढे लोक भारतात आलेच कसे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना केला आहे.

देशाच्या राजकारणात सध्या निवडणूक आयोग आणि मतदारयादीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने रामलीला मैदानावर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांना तातडीने गृहमंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. मतदारयादीतून कोट्यवधी मतदारांची नावे हटवण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. हटवलेल्या मतदारांना बांगलादेशी घुसखोर म्हटले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

याच मुद्द्यावरून राऊत यांनी अमित शाह यांना थेट सवाल केला. १३ कोटी मतदारांना बांगलादेशी म्हणत असाल, तर बांगलादेशची लोकसंख्याच १५ कोटी असताना एवढे लोक भारतात आलेच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घुसखोर आले असतील, तर ती केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे आणि ते त्या मंत्रालयाचे अपयशही आहे. त्यामुळे मोदी यांनी अमित शाह यांना गृहमंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली.

इंडिया आघाडीच्या आंदोलनाबद्दल बोलताना राऊत यांनी १९७४ मधील जयप्रकाश नारायण यांच्या लोकशाही बचाव आंदोलनाची आठवण करून दिली. कालची रॅली त्या आंदोलनापेक्षाही मोठी होती, असा दावा त्यांनी केला. संविधान आणि लोकशाही संस्थांच्या रक्षणासाठी राहुल गांधी यांनी केलेले आवाहन महत्त्वाचे आहे, असेही राऊत म्हणाले. रामलीला मैदानावरची गर्दी भाजपला दिसत नाही, असा टोला लगावत त्यांनी आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगितले.

राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे अमित शाह यांनी म्हटले होते. या विधानावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे की नाही, हे देशातील जनता ठरवेल, अमित शाह नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणीही राऊत यांनी पुन्हा केली. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट मोदी सरकार आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्ष बनला आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ