मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:27 IST

समरकंद ऑलिम्पियाडमध्ये भारताला सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडक, कुंटे यांचे पुण्यात स्वागत

उझबेकिस्तानमधील ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या गटात रौप्य आणि महिला गटात कांस्यपदक मिळवत भारताने गॅपरिंदाश्विली करंडकाची हॅटट्रिक साधली.

समरकंद ऑलिम्पियाडमध्ये भारताला सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडक, कुंटे यांचे पुण्यात स्वागत
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकत्याच झालेल्या ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय बुद्धिबळपटूंनी दमदार खेळ केला आणि सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडकावर नाव कोरले. खुल्या गटात भारताला रौप्यपदक मिळाले, तर महिला गटात कांस्यपदक मिळाले. यामुळे सर्वसाधारण सांघिक विजेतेपदाची हॅटट्रिक झाली. याआधी २०२२ मध्ये चेन्नई येथे आणि २०२४ मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या ऑलिम्पियाडनंतरही भारतानेच हा करंडक पटकावला होता.

खुल्या गटातील भारतीय संघाचे नेतृत्व प्रशिक्षक ग्रँडमास्टर श्रीनाथ नारायणन यांनी केले. या संघात अर्जुन इरिगेसी, आर. प्रज्ञानंद, निहाल सरीन, जगज्जेता डी. गुकेश आणि विदित गुजराथी हे ग्रँडमास्टर होते. महिला संघाचे नेतृत्व प्रशिक्षक ग्रँडमास्टर स्वयंम्स मिश्रा यांनी केले. कोनेरू हंपी, दिव्या देशमुख आणि आर. वैशाली हे ग्रँडमास्टर तसेच वंतिका अग्रवाल आणि सविता श्री या आंतरराष्ट्रीय मास्टर संघात होत्या.

वैयक्तिक कामगिरीतही भारतीय खेळाडू चमकले. सविता श्रीने पदार्पणाच्या ऑलिम्पियाडमध्ये पाचव्या पटावर एकही सामना न हरता १० पैकी ९ गुण मिळवले आणि वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत जॉर्जियाविरुद्धचा सामना भारतीय महिला संघाने बरोबरीत सोडवला, त्यामुळे संघाला कांस्यपदक मिळाले. दिव्या देशमुखने दुसऱ्या पटावर रौप्यपदक पटकावले, तसेच डी. गुकेशनेही रौप्यपदक मिळवले. कोनेरू हंपी आणि वंतिका अग्रवाल यांना कांस्यपदके मिळाली.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे हे भारतीय संघाचे पथकप्रमुख होते. भारतात परतल्यावर पुण्यातील बुद्धिबळप्रेमींच्या वतीने नगरसेवक सुनील पांडे यांनी कुंटे यांचे स्वागत केले. या ऑलिम्पियाडमध्ये आशियाई संघांचा दबदबा राहिला. एकूण सहा सांघिक पदकांपैकी पाच पदके आशियाई संघांना मिळाली. खुल्या गटात उझबेकिस्तान, भारत आणि जर्मनी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. महिला गटात चीन, कझाकिस्तान आणि भारत यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले.

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलताना कुंटे म्हणाले, "हा प्रदीर्घ प्रवास अखेर यशदायी ठरला आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवीन सुधारणा, नियोजनबद्ध पूर्वतयारी आणि सर्वोतोपरी पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांच्या मदतीने केलेल्या परिश्रमांचे हे फळ आहे. भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच सलग तिसऱ्या ऑलिम्पियाडमध्ये आम्ही गॅपरिंदाश्विली करंडक पटकावू शकलो." त्यांनी पुढे सांगितले, "श्रीनाथ नारायणन आणि स्वयंम्स मिश्रा या आमच्या प्रशिक्षकांनी गेली सहा वर्षे अथक परिश्रम घेतले असून ते संघाचा कणा ठरले आहेत. प्रत्येक खेळाडूने शंभर टक्के योगदान दिल्यामुळे ही कामगिरी शक्य झाली."

पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या वतीने अभिजीत कुंटे यांचे कौतुक करण्यात आले. कुंटे हे पुण्याच्या बुद्धिबळ क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. ऑलिम्पियाडमधील प्रशिक्षक म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. बुडापेस्ट २०२४ ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी भारतीय महिला संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. आता समरकंदमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने खुल्या गटात रौप्य आणि महिला गटात कांस्यपदक मिळवताना सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडक पटकावला. सर्कलच्या पत्रकात म्हटले आहे, "या अभूतपूर्व यशाबद्दल आम्ही संपूर्ण भारतीय बुद्धिबळ संघाचे हार्दिक अभिनंदन करतो. हे यश साजरे करण्याची संधी दिल्याबद्दल भारतीय संघाचे आभार."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ