मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:23 IST

धक्कादायक! घरखर्चाच्या वादाने घेतला जीव; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर

नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत घरखर्चाच्या वादातून बाप-लेकात हाणामारी झाली, त्यात मुलाने वडिलांना भोसकले आणि तीन दिवसांनी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

धक्कादायक! घरखर्चाच्या वादाने घेतला जीव; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गंगाबाई घाट आणि गरोबा मैदान या परिसरात घरखर्चाच्या वादातून बाप आणि मुलामध्ये मोठी हाणामारी झाली. घरखर्चात हातभार लावण्यावरून दोघांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता, आणि याच वादाचे पर्यवसान अखेर या हाणामारीत झाले. या भांडणात संतापलेल्या मुलाने हातात स्क्रू ड्रायव्हर उचलला आणि तो थेट वडिलांच्या पोटात भोसकला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी मृत्यू झाला.

मृत व्यक्तीचे नाव बबलू सहारे (वय ५६) असे आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी त्यांचा मुलगा तुषार सहारे (वय २३) याला अटक केली असून, न्यायालयाने तुषारला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बबलू सहारे आरमशिनवर काम करायचे. ते पत्नी ममता (वय ४५) आणि मुलगा तुषार यांच्यासोबत राहत होते. तुषार विवाहित असून तो घरातूनच साईन बोर्ड तयार करण्याचे काम करायचा. मुलगा आता मोठा झाला असल्याने त्यानेही घरखर्चात हातभार लावावा, अशी बबलू यांची अपेक्षा होती. मात्र या अपेक्षेवरून घरात नेहमी तणावाचे वातावरण असायचे.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विशेषतः वीज बिल भरण्यासाठी पैसे देण्यावरून या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. १६ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता याच मुद्यावरून बाप-लेकामध्ये पुन्हा वाद उफाळला. दारूच्या नशेत असलेल्या बबलू यांनी तुषारचा गळा दाबला. या झटापटीदरम्यान तुषारने जवळ असलेला पेचकस उचलून बबलू यांच्या पोटात भोसकला. या हल्ल्यात बबलू गंभीर जखमी झाले.

रक्तबंबाळ अवस्थेत बबलू यांना घराजवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना चांगल्या दवाखान्यात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मेयो रुग्णालयातील उपचारानंतर कुटुंबीयांनी बबलू यांना घरी आणले. मात्र १९ सप्टेंबरला अचानक त्यांची प्रकृती पुन्हा खालावली, त्यामुळे त्यांना तातडीने शताब्दी चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याच संध्याकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

ममता सहारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तुषारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ