क्रशलाही तुम्ही आवडता का? मनातल्या भावना ओळखण्याचे पाच संकेत
एखाद्या व्यक्तीवर क्रश असेल तर तिच्याही मनात तुमच्याबद्दल भावना आहेत का, हे बोलण्यावागण्यातून कसे ओळखायचे, ते पाहा.
एका विशिष्ट वयात आल्यावर कुणावर तरी क्रश येणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. शरीरात अनेक बदल होत असताना मनातल्या भावनाही हळूहळू बदलत जातात. तारुण्यात आल्यावर प्रेम वाटणं किंवा एखादी व्यक्ती आवडणं, ही भावना कधी ना कधी मनात येतेच.
पण बऱ्याचदा माणसं आपल्या मनातली ही भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला घाबरतात. त्यातून मनात बराच गोंधळ तयार होतो. समोरची व्यक्ती आपल्या भावना समजून घेईल का, ती आपल्याबद्दल काय विचार करेल, असे प्रश्न मनात येऊ लागतात. तुमच्याबाबतीतही असंच काही होत असेल, तर ही माहिती तुमच्या कामाची ठरू शकते.
एखाद्यावर प्रेम जडलं की त्याच्या बाईकसारख्या बारीकसारीक गोष्टीही आपण दुरूनच टिपायला लागतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या मनातही कधीकधी आपल्यासारख्याच भावना तयार होत असतात. आपल्या क्रशच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे की नाही, हे तपासायला काही गोष्टी करून पाहता येतात. त्यातून त्याच्या मनातली गुपितं समजायला मदत होऊ शकते.
पहिला संकेत म्हणजे बोलण्यासाठी केलेला प्रयत्न. नातं सुरू व्हायला थोडंफार बोलणं महत्त्वाचं असतं. फक्त कामापुरतं हो किंवा नाही एवढंच न बोलता तुमचा क्रश तुमच्याशी जास्त बोलायचा प्रयत्न करत असेल, किंवा नव्या नव्या विषयांवरून बोलायला बहाणा शोधत असेल, तर त्यालाही तुम्ही आवडत असाल. हे वारंवार घडत असेल आणि ती व्यक्ती तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करत असेल, तर तिच्या मनातही तुमच्याबद्दल आकर्षण असू शकतं.
दुसरा संकेत म्हणजे तुमच्यासाठी वेळ काढणं. एखादी व्यक्ती आवडू लागल्याची भावना मोठ्या गोष्टींमधून नाही, तर अनेकदा लहान लहान कृतींमधून दिसते. समोरची व्यक्ती तुमच्यासोबत जास्त वेळ घालवत असेल, त्यासाठी बहाणे शोधत असेल, किंवा नकळत तुमच्याकडे सतत बघत असेल, तर हे संकेत लक्षात घ्या. यावरून तुम्ही क्रशच्या मनातल्या भावना ओळखायचा प्रयत्न करू शकता.
तिसरा संकेत म्हणजे वागण्यातला बदल. तुमच्याशी बोलताना तो थोडा नर्व्हस होत असेल, त्याचा आवाज मऊ होत असेल, तो तुमची काळजी घेत असेल किंवा तुमच्या लहानसहान गोष्टी लक्षात ठेवत असेल, तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल भावना असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुम्ही क्रशला आवडत असाल, तर तो तुमच्या भविष्यातल्या योजना, विचार, कुटुंब, स्वप्नं आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्नही करेल.