मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:31 IST

गणेशोत्सवासाठी बॉम्बे डाईंगच्या 'सेलिब्रेटिंग इंडिया', 'सौगात' कलेक्शनमध्ये खास होम डेकोर डिझाइन्स

बाप्पाच्या स्वागतासाठी घर सजवायचे असेल तर बॉम्बे डाईंगने गणेशोत्सवासाठी दोन खास कलेक्शन बाजारात आणले आहेत.

गणेशोत्सवासाठी बॉम्बे डाईंगच्या 'सेलिब्रेटिंग इंडिया', 'सौगात' कलेक्शनमध्ये खास होम डेकोर डिझाइन्स
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गणेशोत्सव जवळ आला की घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होते. मोठ्या जल्लोषात बाप्पाला घरात आणल्यानंतर मनोभावे पूजा केली जाते आणि गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. या सणासुदीच्या काळात नुसती पूजा-अर्चा होत नाही, तर घराचा रंगरूपही बदलला जातो. बाप्पाच्या स्वागतासाठी घराला नवा लुक देण्याची पद्धत अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर बॉम्बे डाईंगने यंदाच्या गणेशोत्सवासाठी 'सेलिब्रेटिंग इंडिया' आणि 'सौगात' या नावाने दोन खास कलेक्शन बाजारात आणले आहेत, जी घराला सुंदर आणि आकर्षक रूप देतात.

घर सजवताना नुसता रंग बदलणे पुरेसे नसते, घरातल्या इतर वस्तूंमध्येही बदल करणे तितकेच महत्त्वाचे असते, असे मानले जाते. घरात केलेला एखादा छोटासा बदलही सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करतो, असे सांगितले जाते. त्यामुळे गणेशभक्तांनी या कलेक्शनची खरेदी करावी असे बॉम्बे डाईंगकडून सुचवण्यात आले आहे.

'सेलिब्रेटिंग इंडिया' हे कलेक्शन भारताची समृद्ध कला, संस्कृती आणि कारागिरीपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे. पारंपरिक भारतीय डिझाइन्सना आधुनिक घरांना साजेसे असे नवे रूप या कलेक्शनमध्ये देण्यात आले आहे. यातील सर्व डिझाइन्स शंभर टक्के कॉटनपासून बनवलेल्या आहेत. या नव्या कलेक्शनमध्ये ३०० टीसी आणि डिजिटल प्रिंट्सचा वापर करण्यात आला असून त्यामुळे आरामदायी अनुभवासोबतच बेडरूमला आकर्षक आणि आधुनिक लूक मिळतो. या कलेक्शनची किंमत साधारण ६,४९९ रुपये आहे.

दुसरे कलेक्शन आहे 'सौगात', ज्यामध्ये लाल, मरून, गोल्ड आणि पेस्टल असे सणाला शोभणारे रंग वापरण्यात आले आहेत. पारंपरिक नक्षीकाम आणि आधुनिक डिझाइनचा मेळ या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतो, ज्यामुळे सणाच्या दिवसांत बेडरूम अधिक आकर्षक दिसतो. हे कलेक्शन आकर्षक गिफ्ट बॉक्समध्ये उपलब्ध असल्याने गणेशोत्सव, इतर सणासुदीचे गिफ्टिंग तसेच गृहप्रवेशासाठीही तो चांगला पर्याय ठरू शकतो. या कलेक्शनची किंमत साधारण ५,४९९ रुपये आहे.

१८७९ सालापासूनचा वारसा लाभलेली बॉम्बे डाईंग ही भारतातील घर सजावट क्षेत्रातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय नावांपैकी एक आहे. वाडिया समूहाचा प्रमुख ब्रँड असलेली बॉम्बे डाईंग गुणवत्ता, नावीन्य आणि कालातीत सौंदर्यासाठी ओळखली जाते. या ब्रँडकडून चादरी, टॉवेल, उबदार आच्छादने, ब्लँकेट, उशा, पोशाखांसाठीचे कापड तसेच शाळेच्या गणवेशांसाठीचे कापड अशी घरात वापरता येणारी वस्त्रांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. उत्कृष्ट कापड आणि आधुनिक डिझाइन्समुळे देशभरातील लाखो कुटुंबांची बॉम्बे डाईंगला विशेष पसंती आहे. आधुनिक किरकोळ विक्री केंद्रांसोबतच अधिकृत विक्री केंद्रे आणि वितरण भागीदारीच्या माध्यमातून ब्रँड आपला विस्तार करत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ