मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:21 IST

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाऊ न दिल्याने चोपड्यात सहावीतील मुलाची आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घुमावल गावात १२ वर्षांच्या मुलाने गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांनी नकार दिल्याने टोकाचे पाऊल उचलले.

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाऊ न दिल्याने चोपड्यात सहावीतील मुलाची आत्महत्या
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यास वडिलांनी परवानगी नाकारल्याने रागाच्या भरात सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचं आयुष्य संपवलं. ही घटना चोपडा तालुक्यातील घुमावल गावात घडली असून परिसरात याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घुमावल गावातील या कुटुंबातील १२ वर्षांच्या मुलाला गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत जायचं होतं. पण आई-वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास परवानगी दिली नाही. यामुळे तो नाराज झाला होता. त्यानंतर त्याने घरातील वरच्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं.

कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, हा मुलगा मोबाईलवर सतत रिल्स बघत असे. मात्र आत्महत्येमागचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ४८/२०२६ अशी करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पालकांनी मुलांच्या भावनिक स्थितीकडे, त्यांच्या मोबाईल वापराकडे आणि त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याकडे संवेदनशीलतेने लक्ष द्यायला हवं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

दरम्यान, कोथरुडमध्येही एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. ही घटना २२ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा लेन क्रमांक २९ मध्ये घडली. मृत महिलेचं नाव मोनाली गोविंद पवार (वय २५, राहणार सुतारदरा, कोथरुड) असं आहे. या प्रकरणी तिचा पती गोविंद पवार याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनाली आणि गोविंद यांचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र गोविंदचे एका दुसऱ्या महिलेशी संबंध होते, त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत असत. या वादातून गोविंद मोनालीला शिवीगाळ करत असे आणि मारहाण करत जाच करत असे. २२ ऑगस्टला मोनालीने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या आरोपाखाली पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ